नाशिक

काळ्या फिती लावून न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन

CD
NSK26H29928 जळगाव : न्यायालयीन कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयीन कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी कर्मचारी. --------- काळ्या फिती लावून न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन उपशीर्षक ‘समान काम, समान वेतन’ मागणीसाठी शासनाचे वेधले लक्ष सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १८ : न्यायालयीन कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयीन कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेतर्फे नुकतेच काळ्या फिती लावून शांततामय आंदोलन करण्यात आले. उच्च न्यायालयाने दोन न्यायमूर्तींची समिती स्थापन करून दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, या प्रस्तावाच्या अंमलबजावणीबाबत शासन स्तरावर होत असलेल्या विलंबाकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जळगाव जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आंदोलनादरम्यान सर्व कर्मचाऱ्यांनी शांतता, शिस्त व संयम राखत काळ्या फिती लावून आपला निषेध नोंदविला. विशेष म्हणजे, न्यायालयीन कामकाजात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेण्यात आली. चौकट ‘वेतनश्रेणीचा प्रश्‍न त्वरित मार्गी लावा’ ‘समान काम, समान वेतन’ या मागणीसाठी महाराष्ट्रातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग नोंदविल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आजचे आंदोलन शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने व यशस्वीरीत्या पार पडल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. शासनाने उच्च न्यायालयाकडून प्राप्त प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेऊन न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी यावेळी जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्याम शिंदे व संघटनेचे पदाधिकारी यांनी केली. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

SCROLL FOR NEXT