फोटो : H29930
गंगापूर रोड : जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२६ या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करताना उपस्थित मान्यवर.
---
विज्ञानाची किमया मांडली नाटकातून
नाट्योत्सवातील विजेत्यांचा पारितोषिकाने गौरव
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १८ : जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघातर्फे जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२६ चे आयोजन केले होते. सहभागी शाळांच्या संघांनी विज्ञानाची किमया अतिशय प्रभावीपणे नाटकातून मांडली. स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिकाने गौरव करण्यात आला.
मविप्र संस्थेच्या सीएमसीएस महाविद्यालय येथे आयोजित केलेल्या स्पर्धेचे उद्घाटन मविप्र सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते झाले. नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष विनीत पवार, सीएमसीएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एन. शेलार, शिक्षणाधिकारी सरोज जगताप आदी उपिस्थत होते. समारोप कार्यक्रमास उपशिक्षणाधिकारी आकुसकर उपस्थित होते. जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे कार्यवाह कल्पेश चव्हाण, उपाध्यक्ष योगेश जाधव, राज्य प्रतिनिधी दत्तराज ह्याळीज, कोषाध्यक्ष रमाकांत भामरे, सहकोषाध्यक्ष सुभाष सोनवणे आदींचे सहकार्य लाभले. कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रिक वाहने, आंतरतारकीय अधिवास, महासागरांचे पुनरुज्जीवन यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अभिनय, वास्तव कथानक, नेपथ्य आणि प्रभावी दिग्दर्शनाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासत सामाजिक संदेश दिला. तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनातून निवड झालेल्या प्रत्येकी एका चमूने जिल्हा स्तरावर आपल्या तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. परीक्षक म्हणून लेखक, दिग्दर्शक रोहित पगारे, डॉ. प्रसादशास्त्री कुलकर्णी, डॉ. सचिन पाटील यांनी काम पाहिले. उपशिक्षणाधिकारी नरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले होते. मविप्र सेवक संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष दत्तराज ह्याळीज यांनी सूत्रसंचालन केले, आभार योगेश जाधव यांनी मानले.
--------
विजेते
स्पर्धेत भाटगाव (ता. चांदवड) येथील नूतन माध्यमिक विद्यालय संघाची विभागीय स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाने निवड झाली. या विद्यार्थ्यांना संतोष गांगुर्डे यांचे मार्गदर्शन लाभले. नाशिकच्या मराठा हायस्कूलला द्वितीय, लोहणेर (ता. देवळा) जनता विद्यालयास तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. कुडकुडणे (ता. सुरगाणा) येथील पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा संघाला तसेच सिन्नरच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयाच्या संघाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.