नाशिक

महिनाभरापूर्वीच लग्न झालेल्या अभियंता तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

CD
NSK26H29939 : गौरव देशमुख --- महिनाभरापूर्वी लग्न झालेल्या अभियंत्याची आत्महत्या कारण अस्पष्ट; आदल्या दिवशी पत्नी, कुटुंबीयांसोबत पाहिला लग्नाचा अल्बम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १८ : गेल्या महिनाभरापूर्वीच लग्न झालेल्या गौरव हरीशचंद्र देशमुख (वय २८, रा. गणेश कॉलनी) या अभियंता तरुणाने रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गौरव देशमुख हा बांधकाम मक्तेदारीचे काम करायचा. गुरुवारीदेखील तो कामाच्या ठिकाणी होता. त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास बजरंग बोगद्याजवळ जाऊन त्याने रेल्वेसमोर झोकून दिले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिस चौकीचे पोलिस कर्मचारी किरण बारी, गणेश राजपूत हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळी तरुणाचा तुटलेला मोबाईल आढळला. त्यावेळी लोहमार्ग पोलिसांनी त्यातील सिमकार्ड दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकून संपर्क साधला. कुटुंबाला माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. त्यावेळी तरुणाची ओळख पटली. गौरव देशमुख हा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील हरिशचंद्र देशमुख हे देखील अभियंता आहेत. दोघांची शहरात कामे सुरू आहेत. घरात सर्व परिस्थिती चांगली असताना त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण समजू शकले नाही. चौकट रात्री गणेश मंडळातही सहभाग गौरव देशमुख या तरुणाचे १६ ऑगस्टला लग्न झाले. घटनेच्या आदल्या दिवशी गौरव याने पत्नी व कुटुंबीयांसोबत लग्नाचा अल्बम पाहिला. तसेच गुरुवारी रात्री तो गणेश मंडळाच्या ठिकाणी जाऊन तरुणांसोबत नाचलादेखील होता. त्यानंतर त्याने हे पाऊल उचलले. बजरंग बोगद्याजवळ तरुणाची दुचाकी आढळून आली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Sonsने चंद्रशेखरन यांना निवडलं, पण टाटा ट्रस्ट्सचा विरोध! नोएल टाटाच खरे किंगमेकर? टाटामध्ये चेअरमनची निवड कशी होते?

Jos Buttler: जॉस बटलरचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १५,००० धावा करणारा फलंदाज; विराट कोहली, रोहित शर्मा टॉप ५ मध्येही नाहीत

आम्ही कुठे जायचं? न्यायाधीशाचा प्रश्न; ५ महिन्यात २३ जणांना फाशीची शिक्षा, आता ९७ गंभीर खटले ट्रान्सफर होताच संतापले

गर्दीतून जात होती सलमान खानची कार, ड्रायव्हरच्या चूकीमुळे भाईजान चिडला, चालकाला जोरात मारलं अन्... Viral Video

Insulin Resistance Symptoms: डायबेटीस होण्याआधी शरीर देतं ‘हे’ संकेत; असं ओळखा तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे की नाही!

SCROLL FOR NEXT