ॲंकर
भुुसावळ परिसर पानासाठी
---------
फोटो तीन कॉलम घ्यावा
NSK26H29941
भुसावळ : पालिकेतील विशेष बैठकीत सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत आढावा घेताना राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान. सोबत प्रभारी नगराध्यक्षा शैलेजा नारखेडे, मुख्याधिकारी जनार्धन पवार, व पालिका कर्मचारी आदी.
-------------
भुसावळात सफाई कामगारांच्या प्रश्नांवर बैठक
-----
कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांनी पालिकेत घेतला अंमलबजावणीचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता. १८ : येथील नगरपालिकेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. यावेळी प्रभारी नगराध्यक्षा शैलेजा नारखेडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी जनार्धन पवार व पालिकेतील संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
सफाई कर्मचाऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलती, त्यांचे न्याय व हक्क, प्रलंबित प्रश्नांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः वारसा हक्काच्या प्रलंबित प्रकरणांमध्ये मंजूर पदे, भरलेली पदे व रिक्त पदांची माहिती घेण्यात आली.
सफाई कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविणे व पात्र कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्याबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.
नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद व विविध शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्यक्ष भेटी घेऊन आढावा बैठका घेण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्कातून तीन नियुक्त्या देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी घेण्यात आलेल्या या बैठकीत त्यांच्या सेवा-सुविधा, हक्क व कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात चर्चा झाली. प्रलंबित प्रश्नांपैकी कोणते प्रश्न तातडीने मार्गी लागतात व पुढील काळात कोणते निर्णय घेतले जातात, याकडे सफाई कर्मचारी व त्यांच्या संघटनांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.