नाशिक

निर्माल्य प्लास्टिकच्या पिशवीत घेवू नका नको

CD
मेन फिचर पान ३ --- NSK26H29942 जळगाव : मेहरुण तलाव येथील गणेश घाट येथील स्वच्छतेची पाहणी करताना महापौर दीपमाला काळे. ....... निर्माल्य कागदात आणा; प्लास्टिक टाळा महापौर दीपमाला काळे यांनी घेतला गणेश विसर्जन व्यवस्थेचा आढावा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १८ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीचा महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवारी (१८) सकाळी मेहरूण तलावातील गणेश घाटावर प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. यात पर्यावरणाच्या संवर्धनासाठी गणेश विर्सजन देखील प्लॅस्टिकमुक्त झाले पाहिजे, यासाठी उपायोजना करा, भाविकांची गर्दी, स्वच्छता, निर्माल्य संकलन तसेच आरोग्य सुविधांची पाहणी करताना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. महापौर काळे यांनी घाट परिसरातील निर्माल्य कलश आणि संकलन डब्यांची पाहणी केली. यावेळी काही भाविक प्लास्टिकच्या पिशव्यांमधून निर्माल्य आणत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तलावाचे प्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये न आणता कागदात गुंडाळून आणावे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या वेळी आरोग्य विभागप्रमुख समीर बोरोले, अभियंता आर. टी. पाटील यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापौर काळे यांनी केले. वैद्यकीय पथक २४ तास ठेवा पाचव्या दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी घाटावर आलेल्या भाविकांशी महापौरांनी संवाद साधत महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची माहिती घेतली. विसर्जनाच्या काळात भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची पुरेशी नियुक्ती करण्याबरोबरच वैद्यकीय पथक चोवीस तास सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. चौकट सुरक्षा व्यवस्था चोख ठेवा घाटावरील स्वच्छता, मनुष्यबळ आणि सुरक्षाव्यवस्थेचाही यावेळी आढावा घेण्यात आला. आरोग्य विभागाकडून विसर्जनासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची माहिती महापौरांनी घेतली. पर्यावरणाचे संरक्षण आणि भाविकांची सुरक्षितता यांना प्राधान्य देत गणेश विसर्जनाची प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ३ महिन्यांचं वेतन दिलं पूरग्रस्तांसाठी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाठवले पैसे

'चला हवा येऊ द्या'मध्ये तुकाराम मुंढेंचं पात्र साकारण्यास निलेश साबळेंचा नकार; कारण काय?

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

SCROLL FOR NEXT