एन्कर
घरोघरी ज्येष्ठा गौरींचे थाटामाटात पूजन
नऊवारी साडी, दागदागिने आणि पुरणपोळीचा महानैवेद्य
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १८ : गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी आगमन झालेल्या महालक्ष्मींचे शुक्रवारी (ता. १८) मुख्य पूजनाच्या दिवशी घरोघरी पूजन करण्यात आले. पंचवटीतील ऐतिहासिक वाड्यांपासून ते उपनगरांतील आधुनिक गृहसंकुलांपर्यंत सर्वत्र गौरी पूजनाचा उत्साह ओसंडून वाहत होता.
सकाळी मुहूर्तावर महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून गौरींची पूजा केली. पारंपरिक पद्धतीनुसार काही घरांमध्ये धातूच्या, शाडूच्या मूर्ती, पितळाच्या तर काहींकडे पाना-फुलांच्या गौरींची स्थापना करण्यात आली होती. आगमनानंतर गौरींना सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी, नऊवारी साड्यांनी आणि विविध प्रकारच्या फुलांच्या माळांनी आकर्षक रीतीने सजविण्यात आल्याने गौराईंचे रूप अधिकच खुलून दिसत होते. ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी महालक्ष्मींना विशेष नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. पुरणपोळी, १६ प्रकारच्या भाज्या, कोशिंबिर, विविध प्रकारच्या चटण्या, फराळाचे पदार्थ आणि गोडाधोडाचा महानैवेद्य तसेच गोविंद विडा अर्पण केला जातो. सायंकाळी महिलांसाठी हळदीकुंकवाचे आयोजन करण्यात आले. एकमेकींना वाण देऊन, गौरींची गाणी आणि आरती गाऊन महिलांनी सण आनंदाने साजरा केला. काही ठिकाणी गौरींच्या मुखवट्यांची विशेष आरास आणि देखावे उभारण्यात आले होते. ते पाहण्यासाठी आप्तेष्टांची मांदियाळी जमली होती.
--चौकट
आज उत्तरपूजा आणि विसर्जन
शनिवारी (ता. १९) सकाळी उत्तरपूजा करून लाडक्या गौरींना निरोप दिला जाईल. सकाळी खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवून मुखवटे हलवून ठेवावेत व नंतर सोयीनुसार इतर कार्य करण्याचे धर्मशास्त्राच्या सूचित केले आहे.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.