नाशिक

आंदोलकांची प्रकृती खालावली

CD
धुळे ः टुडे २ किंवा ३ साठी --- फोटो क्रमांक ः 29976 धुळे ः महापालिकेविरोधात आंदोलन करताना भारतीय संविधान सेनेचे आंदोलक. --- मनपा भूमिकेविरोधात बेमुदत उपोषण भारतीय संविधान सेनेच्या दोन आंदोलकांची प्रकृती खालावली सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १८ : शहरातील जुन्या महापालिकेचे मागील गेट उघडणे, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे आदी विविध मागण्यांसाठी भारतीय संविधान सेनेच्या नेतृत्वात सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाने शुक्रवारी (ता. १८) बारावा दिवस पूर्ण केला. मात्र, महापालिका प्रशासनाकडून अद्यापही कोणतीही ठोस दखल न घेतली गेल्याने आणि उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले आहे. यात तीन नव्या सदस्यांनी उपोषणात सहभाग घेतला असून, प्रशासनाच्या निरुत्साही भूमिकेबद्दल आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय संविधान सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. प्रशासनाने राजकीय दबापोटी दुजाभाव चालवल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. त्यांच्या मागण्या अशा ः मनपा क्षेत्रातील ‘बाबासाहेब कोतवाल ट्रस्ट’चे अनधिकृत बांधकाम तत्काळ काढावे, जुन्या मनपचे बंद मागील गेट सर्वसामान्यांसाठी तत्काळ खुले करावे, आंदोलन स्थळावरील महिला व कार्यकर्त्यांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी आणि दर्जेदार स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. आंदोलनकर्त्यांचा इशारा यापूर्वी उपोषणकर्ते आबा अमृतसागर आणि दावल वाघ यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज भासली. प्रशासनाने अद्यापही लिखित किंवा कालबद्ध निर्णय न दिल्याने शुक्रवारपासून आशाबाई दावल वाघ, अभियंता रवी पवार, ज्योती रावत, चिंतामण थोरात, कल्पना इंदवे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषण सुरू असताना किंवा या आंदोलनादरम्यान कोणत्याही आंदोलकाच्या जिवास किंवा आरोग्यास काहीही इजा पोहोचल्यास, त्याची सर्वस्वी कायदेशीर, नैतिक व फौजदारी जबाबदारी महापालिका आयुक्त, तसेच संबंधित अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांची राहील, असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Relief : ७३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजारांची मदत - फडणवीसांची माहिती; उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

Navi Mumbai: माजी मंत्र्याचा अनधिकृत कारभार? मोरबे धरण क्षेत्रात अलिशान फार्म हाऊसची उभारणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : संभाजीनगर मनपाची मालमत्ताधारकांना दिवाळी भेट, थकबाकीवरील १००% व्याज माफ

IPL 2027 Trade: चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याला 'ठेंगा' दाखवला; SRH चे दोन तगडे खेळाडू आपल्या संघात घेतले, त्याबदल्यात कोणाला दिले?

SCROLL FOR NEXT