धुळे ः प्रथम टुडे २ किंवा टुडे ३ साठी.....जागा नसल्यास नंतर टुडे १ ला घ्यावी....
---
धनादेश न वटल्याप्रकरणी
एकाला सश्रम कारावास
जिल्हा न्यायालयाकडून सव्वा लाखांचा दंड
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १८ ः धनादेश न वटल्याच्या एका प्रकरणात येथील अतिरिक्त मुख्य न्यायाधीशांनी कर्जदारास एक महिना सश्रम कारावास आणि सव्वा लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. नुकसान भरपाईपोटी ही रक्कम फिर्यादी कंपनीला अदा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. राजेश मैकुलला चित्ते (रा. धुळे) असे शिक्षा झालेल्या कर्जदाराचे नाव आहे.
शालिभद्रा फायनान्स कंपनी लि.च्या धुळे शाखेकडून राजेश चित्ते यांनी ९३ हजारांचे वाहन कर्ज घेतले होते. या कर्जाच्या थकीत हप्त्यांच्या परतफेडीसाठी त्यांनी फायनान्स कंपनीला एक लाख १६ हजार ३९९ रुपयांचे धनादेश दिले होते. मात्र, हे धनादेश बँकेत जमा केले असता ते वटले नाहीत (बाऊन्स झाले). त्यामुळे शालिभद्रा फायनान्स कंपनीने जिल्हा न्यायालयात राजेश चित्ते यांच्याविरोधात खटला दाखल केला होता.
न्यायालयाचा निकाल
साक्षी-पुराव्यांची तपासणी केल्यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एम. बी. असीजा यांनी चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम १३८ अन्वये आरोपी राजेश चित्ते यास दोषी ठरविले. त्याला एक महिना सश्रम कारावास आणि नुकसान भरपाईपोटी एक लाख २५ हजारांची रक्कम अदा करण्याचा आदेश दिला. खटल्यात फिर्यादी शालिभद्रा फायनान्स कंपनीतर्फे प्रतिनिधी लक्ष्मण रघुनाथ बागूल यांनी साक्षी-पुरावे दिले. या खटल्याचे कामकाज ॲड. अशफक शेख यांनी पाहिले, तर त्यांना ॲड. फारूक बी. शेख, ॲड. आय. एस. काजी, ॲड. योगिता कांबळे, ॲड. सुलताना अन्सारी यांनी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.