नाशिक

धुळे टुडे १ संक्षीप्त

CD
धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त --- बनावट ८-अ उतारा; फसवणुकीची तक्रार धुळे : उभंड (ता. साक्री) येथे ग्रामपंचायतीच्या शासकीय जागेवर अतिक्रमण करून बनावट ८-अ उतारा तयार केल्याप्रकरणी संशयित भटू शालीकराव पाटील (रा. उभंड) याच्याविरुद्ध निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पाटील याने शासकीय जागेचा गाव नमुना क्रमांक आठचा बनावट उतारा तयार करून त्यावर खोट्या सह्या व शिक्के मारले. हा उतारा खरा असल्याचे भासवून वैयक्तिक फायद्यासाठी त्याचा वापर करत शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. हा प्रकार २ फेब्रुवारी ते १६ सप्टेंबर या कालावधीत घडला. ग्रामपंचायत अधिकारी रोहन सुरेश सेंदाणे (रा. साक्री रोड, धुळे) यांच्या फिर्यादीनुसार ही कारवाई झाली. --- कॉपर केबलसह वाहन लांबविले धुळे : टिटाणे (ता. साक्री) शिवारातील सुझलॉन कंपनीच्या पवनऊर्जा टॉवर क्रमांक के-२४५ मधून चोरट्यांनी १५० किलो कॉपर केबल आणि कंपनीची गाडी, असा तीन लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबविला. ही घटना १६ सप्टेंबरला पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. चोरट्यांनी एक लाख २७ हजार ५०० रुपये किमतीची कॉपर केबल आणि अडीच लाखांची गाडी (जीजे ०५, जेसी ८८२९) नेली. याप्रकरणी सिक्युरिटी मालक ज्ञानेश्वर पवार (रा. आमलेख, ता. साक्री) यांच्या फिर्यादीनुसार निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. --- कार, मोबाईल चोरी; चौघांविरुद्ध गुन्हा धुळे : साक्री येथील हॉटेल न्यूपार्क व अनूपार्कसमोर उभी केलेली कार आणि मोबाईल, असा एक लाख ७० हजारांचा मुद्देमाल संशयितांनी लांबविला. यात दीड लाखाची कार (जीजे २६, केई २७५१) आणि २० हजारांच्या मोबाईलचा समावेश आहे. ही घटना १३ सप्टेंबरला सायंकाळी पावणेआठच्या सुमारास घडली. शमुवेल दिल्या गावित (रा. काळांबा, ता. नवापूर, जि. नंदुरबार) हे हॉटेलसमोर थांबले असताना संशयित गौरव पवार (रा. साक्री) व त्याच्यासोबतच्या तीन जणांनी चोरी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. शमुवेल गावित यांच्या फिर्यादीनुसार साक्री पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. --- दुचाकी घसरून महिलेचा मृत्यू धुळे : मुंबई- आग्रा महामार्गावरील आशीर्वाद हॉस्पिटलजवळ दुचाकीसमोर वराह आडवे आल्याने चालकाने ब्रेक दाबला. त्यात दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात मागे बसलेल्या संध्या बाळासाहेब पाटील (वय ५३, रा. कापडणे, ता. धुळे) गंभीर जखमी झाल्या. त्यांना जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ही घटना १६ सप्टेंबरला घडली. बाळासाहेब पाटील (वय ५९) हे पत्नी संध्या यांच्यासह दुचाकीने कापडणे येथे जात असताना धुळे-सोनगीरदरम्यान हा अपघात झाला. याप्रकरणी जयवंत पाटील यांच्या फिर्यादीनुसार दुचाकीचालक बाळासाहेब पाटील यांच्याविरुद्ध पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rozgar Mela : उद्या तब्बल ५१,००० तरुणांचे नशीब उजळणार ! पंतप्रधान मोदी युवकांना'ड्रीम जॉब'ची नियुक्तीपत्रे प्रदान करणार

Shirur Firing: शिरूरमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोळीबार; पूर्ववैमनस्यातून बिअर बार चालक तरुणाची हत्या

Student Safety: रिटेवाडी जिल्हा परिषद शाळेत जल जीवन मिशनची अर्धनिर्मित पाण्याची टाकी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका, ग्रामस्थांची आक्रमक कारवाईची मागणी

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Shirur fake tiger scare: कोंढापुरीत एआयच्या मदतीने बनावट वाघाचा फोटो, अफवा पसरवणाऱ्या युवकाला वनविभागाची समज

SCROLL FOR NEXT