धुळे टुडे २ साठी...
---
फोटो- NSK26H29988
धुळे ः शालेय जिल्हास्तरीय वुशू क्रीडा स्पर्धेत यशप्राप्त आरएससी विद्यालयाच्या खेळाडूंसह मान्यवर.
---
‘आरएससी’ विद्यालयाचे वुशू स्पर्धेत यश
पाच खेळाडूंची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १८ ः जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा क्रीडासंकुल येथे आयोजित शालेय जिल्हास्तरीय वुशू क्रीडा स्पर्धेत मेहेरगाव येथील राजश्री शाहू छत्रपती माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. आपापल्या वजन गटात प्रथम क्रमांक मिळवत या पाचही खेळाडूंनी विभागस्तरीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला.
या स्पर्धेत १७ व १९ वर्ष वयोगटांतील १२० हून अधिक खेळांडून सहभाग घेतला. १७ वर्ष वयोगटांत अनुष्का खेडवण व तन्मय पाटील, तर १९ वर्ष वयोगटांत मयूर पाटील, कुणाल भामरे व उज्ज्वल देसले यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. नंदुरबार येथे २१ व २२ सप्टेंबरला होणाऱ्या विभागस्तरीय वुशू स्पर्धेत हे पाचही खेळाडू धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. स्पर्धा राज्य कार्डी मार्गदर्शिका श्वेता गवळी, धुळे जिल्हा वुशू असोसिएशनचे सचिव राहुल बर्वे यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा झाली. विजयी खेळाडूंना समाधान भामरे, क्रीडाशिक्षक संजय देवरे व एस. एम. चिंचेलो यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण पाटील, संचालक डॉ. मिलिंद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या मीनल पाटील, प्राचार्य विलास पवार, पर्यवेक्षक जीवन भामरे यांनी खेळाडूंचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.