नाशिक

जिल्हाधिकारी आयुष् प्रसाद यांनी वर्तविला अंदाज

CD
‘आधी पाणी, मग पीक’; रब्बीचे क्षेत्र घटण्याची शक्यता अल निनोचा पावसावर परिणाम; कमी पाऊस झालेल्या तालुक्यांत सिंचनाचे गणित महत्त्वाचे सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १८ : अल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने त्याचा फटका रब्बी हंगामाला बसण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाणीसाठा आणि जमिनीतील ओलाव्याची स्थिती लक्षात घेता यंदा रब्बीचे क्षेत्र घटण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारभावाच्या अपेक्षेपेक्षा उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊनच पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असला तरी नांदगाव, मालेगाव, येवला आणि सिन्नर तालुक्यांतील काही भागांत पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे या भागात रब्बी हंगामासाठी सिंचनाचे पाणी किती उपलब्ध होणार, यावर पेरणीचे क्षेत्र अवलंबून राहणार आहे. खरीप पिकांची स्थिती सध्या नियंत्रणात असली तरी पुढील हंगामासाठी उपलब्ध पाण्याचा आढावा कृषी विभागाकडून घेण्यात येत आहे. कांदा आणि अन्य प्रमुख पिकांना सध्या चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी रब्बीत या पिकांकडे वळण्याची शक्यता आहे. मात्र, ‘बाजारभावापेक्षा पिकाला लागणारे पाणी महत्त्वाचे’ ठरणार आहे. उपलब्ध पाण्याचा विचार न करता पेरणीचे क्षेत्र वाढविल्यास हंगामाच्या मध्यावर सिंचनाचे संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे ‘आधी पाणी, मग पीक’ या सूत्रानुसार नियोजन करण्याची गरज प्रशासनाने व्यक्त केली आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा या पश्चिम पट्ट्यात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणसाठ्याला आधार मिळाला आहे. या भागातील भातपिकांची स्थितीही चांगली आहे. पाण्याचे नियोजन सुरू धरणे, कालवे आणि नद्यांमधील उपलब्ध पाण्याचे महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती तसेच उद्योगांसाठी क्षेत्रनिहाय नियोजन सुरू आहे. त्याचवेळी शेतीसाठी किती पाणी उपलब्ध होणार, याचेही नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे रब्बीचे संभाव्य क्षेत्र, पिकांची पाण्याची गरज आणि उपलब्ध साठा यांचा ताळमेळ साधण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. कमी पाऊस झालेल्या गावांची पाहणी रब्बीचे क्षेत्र घटण्याची शक्यता असली तरी सर्वच भागांतील परिस्थिती समान नाही. पुरेसा जलसाठा आणि जमिनीत ओलावा असलेल्या भागांत परिस्थितीनुसार पेरणी करता येणार आहे. मात्र, कमी पाऊस झालेल्या भागांत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. अशा गावांची प्रत्यक्ष पाहणी करून पाणी व शेतीची स्थिती जाणून घेण्याचे निर्देश तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना दिल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : विमान हवेत असताना दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latur Crop Loss: निलंगा तालुक्यात खरीप पीक शंभर टक्के उद्ध्वस्त; कृषी विभागाच्या ‘७० टक्के’ अहवालावर शेतकऱ्यांचा संताप

Sahyadri Sugar Mill: सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; घोषणाबाजी, गदारोळ आणि तणावपूर्ण वातावरण

Malegaon Tractor Attack Case: माळेगावात ट्रॅक्टरने जीवे मारण्याचा प्रयत्न; नरूटे कुटुंबीयांवर हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

SCROLL FOR NEXT