नाशिक

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पत्रकार परिषदेत माहिती

CD
वंचित घटकांना ‘सेवा पुरविण्याचा संकल्प’ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १९ : सेवा संकल्प अभियानातून समाजातील वंचित, दुर्बल आणि पात्र घटकांना शासनाच्या विविध योजना, सेवा व सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. एकही व्यक्ती या सेवांपासून वंचित राहू नये, यासाठी प्रत्येक गावात शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, सेवा संकल्प अभियानांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत ‘रस्ते अदालत’ आयोजित करण्यात येणार आहे. स्थानिक रस्त्यांशी संबंधित समस्या, प्रलंबित कामे व नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पाणंद रस्त्यांची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी निराधार योजनेपासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचा योजनांमध्ये समावेश करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. विविध सात प्रकारच्या आजारांनी बाधित पात्र नागरिकांचा योजनांमध्ये नियमानुसार समावेश करण्यासोबतच मृत व्यक्तींची नावे लाभार्थी यादीतून वगळणे, दिव्यांग व अन्य वंचित घटकांचा पात्रतेनुसार समावेश करण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे. वन हक्क दावे, क्षेत्र दुरुस्ती तसेच घरकुलासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबतही विशेष कार्यवाही केली जाणार आहे. गावातील कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट निश्चित करून तेथे स्वच्छता व सौंदर्यीकरण करण्यात येणार असून, जलस्रोतांची स्वच्छता करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अरविंद केजरीवालांसह कुटुंबातील ५ जणांना निवडणूक आयोगाकडून नोटीस, कारण काय?

iPhone युजर्ससाठी WhatsAppचे खास गिफ्ट; मेसेज अन् चॅनेल अपडेट्स शोधणे होणार सोपे! पाहा नवे 'सर्च' फीचर...

Nagpur Crime: नागपुरात मकोका आरोपीचा रुग्णालयातून पलायन; मेडिकल कॉलेजच्या शौचालयाची खिडकी तोडून फरार

Latest Marathi News Update : IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संताप; मुख्य गेटबाहेर दिवे लावून आंदोलन

Gangapur Crime: गंगापुरात वृद्ध शेतकऱ्याची दीड लाखांची रोख रक्कम लंपास; बँकेसमोरून हेल्मेटधारी चोरट्यांचा थरार

SCROLL FOR NEXT