फोटो : NSK26H29896
नंदुरबार : चित्ररथाचे उद्घाटन करताना डॉ. मिताली सेठी, डॉ. चंद्रकांत पवार आदी.
----------------------
जिल्ह्यात ‘सेवा संकल्प’ अभियानास प्रारंभ
जिल्हाधिकारी, प्रकल्प अधिकाऱ्यांनी दाखवितला हिरवा झेंडा
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १९ : आदिवासी विकास विभाग संचलित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून केला.
आदिवासी समाजातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, सेवा आणि उपक्रमांची माहिती पोहोचविणे हा ‘सेवा संकल्प अभियान’चा मुख्य उद्देश आहे. चित्ररथाच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासीबहुल भागांमध्ये जाऊन शासनाच्या योजनांची माहिती, योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया तसेच, उपलब्ध शासकीय सेवांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. ‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना आणि सेवा प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांनी सांगितले.
या वेळी सहायक प्रकल्प अधिकारी बी. एफ. वसावे, सहायक प्रकल्प अधिकारी देवेंद्र पाटील, रवींद्र देवरे, किरण मोरे, कार्यालय अधीक्षक कौशल्या पाडवी, योगेश बागल, शिक्षण विस्तार अधिकारी डी. एच. माळी, व्ही. व्ही. सोनार, ए. बी. आव्हाड, एस. एस. पाटील, रवींद्र निकम, लेखाधिकारी सुंदरसिंग पावरा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिक्षण विस्तार अधिकारी डी. एच. माळी यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.