नाशिक

श्रॉफ हायस्कूलमध्ये हिंदी दिवस साजरा

CD
फोटो : NSK26H30011 नंदुरबार : येथील श्रॉफ हायस्कूलमध्ये हिंदी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित प्रशांत बागूल. शेजारी डॉ. भगवान राजपूत, भिकू त्रिवेदी, सीमा पाटील, सुनील शाह. ---------- हिंदी भाषा संस्कृतीला जोडणारी प्रशांत बागूल : श्रॉफ हायस्कूलमध्ये हिंदी दिवस उत्साहात नंदुरबार, ता. १९ : हिंदी भाषा विविध प्रांत आणि संस्कृतींना जोडणारी महत्त्वपूर्ण भाषा आहे. विद्यार्थ्यांनी हिंदीचा उपयोग वाचन, लेखन आणि प्रभावी संभाषणासाठी करून आपल्या भाषिक कौशल्याचा विकास करावा, असे आवाहन प्राचार्य प्रशांत बागूल यांनी केले. येथील श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. हिंदी भाषेचे सौंदर्य, सामर्थ्य आणि समृद्ध साहित्यपरंपरेची ओळख करून देणारा हा कार्यक्रम शैक्षणिक वातावरणात उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रशांत बागूल होते. डॉ. भगवान राजपूत प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. उपप्राचार्य भिकू त्रिवेदी, पर्यवेक्षिका सीमा पाटील व पर्यवेक्षक सुनील शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. भगवान राजपूत यांनी हिंदी भाषेची व्यापकता आणि साहित्यिक समृद्धी यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी हिंदी साहित्याचे नियमित वाचन करून आपल्या विचारांना प्रभावी अभिव्यक्ती द्यावी, असे त्यांनी सांगितले. राहुल वडनेरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी देविदास पाटील, मीना नंदवाळकर, सुनील राणा, चंद्रेश राणा, गीता महाजन, शीला पाटील, अनिल मंडलिक यांनी परिश्रम घेतले. सुनील गिरासे यांनी कार्यक्रमाचे चित्रीकरण केले. शिवाजी माळी यांनी फलक लेखन केले.

Bank Holiday: पुढच्या आठवड्यात बँका कधी सुरू, कधी बंद? अनंत चतुर्दशीला बँकाना सुट्टी? पाहा पूर्ण अपडेट

मुख्यमंत्र्यांना दारू, अंडी-टोमॅटो देण्याचा प्रयत्न, भाजप नेत्याला घेतलं पोलिसांनी ताब्यात

Nanded Cashew Almond Video : नांदेडच्या बैठकीतील काजू-बदामाचा व्हिडीओ व्हायरल; हिंगोलीत शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसमोर बशी ठेवत केला निषेध

Ganeshotsav Nigeria: सातारच्या सुपुत्राने नायजेरियात रुजवली गणेशोत्सवाची परंपरा; १६ वर्षांपासून लागोसमध्ये बाप्पाचा जयघोष, सातासमुद्रापार मराठी मातीचा सुगंध

Latest Marathi News Update : मालकाच्या मुलीचा WhatsApp DP पाहिला अन् 3.70 कोटी पाठवले

SCROLL FOR NEXT