NSK26H30007
जळगाव : पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथे गिरणा नदीपात्रात महसूल, पोलिस व आरटीओ विभागाने अवैध वाळू उपशाविरोधात संयुक्त कारवाई केली. कारवाईत सहभागी झालेले पथक.
-----
वाळू माफियांविरोधात प्रशासनाचा पुन्हा ‘स्ट्राईक’
उपशीर्षक
महसूल-पोलिस-आरटीओची कारवाई; गिरणा पात्रातून २९ वाहने जप्त
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ : गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी महसूल विभाग, पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी (ता.१८) सकाळी ५ वाजता कुरंगी, ता. पाचोरा येथील गिरणा नदीपात्रात धडक कारवाई केली. या कारवाईत अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी एकूण २९ वाहने ताब्यात घेण्यात आली.
या कारवाईत हायवा, ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रॅक्टर तसेच उत्खननासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामुग्रीचा समावेश आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या वाहने, यंत्रसामुग्री व वाळूसाठा असा एकत्रित सुमारे ३ कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेली सर्व वाहने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (MAIDC) खत कारखाना येथील गोडाऊन परिसरात सुरक्षितरीत्या लावण्यात आली आहेत.
१४-१
या पथकाचा समावेश
ही कारवाई उपविभागीय अधिकारी, पाचोरा भूषण अहिरे, तहसीलदार पाचोरा विजय बनसोडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव व भडगाव, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, निवासी नायब तहसीलदार विनोद कुमावत, मंडळ अधिकारी आर. डी. पाटील, वैशाली पाटील, भरत नन्नावरे, प्रकाश डहाके, राहुल पवार यांच्यासह महसूल व पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केली.
चौकट
ताब्यातील वाहनांचा पंचनाम सुरू
ताब्यात घेण्यात आलेल्या वाहनांबाबत नियमानुसार पंचनामा व इतर आवश्यक कार्यवाही सुरू असून, संबंधितांविरुद्ध प्रचलित महसूल तसेच इतर लागू कायद्यांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी महसूल विभागामार्फत यापुढेही नियमित तपासणी व धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.