धुळे ः टुडे १ साठी
---
फोटो क्रमांक ः 30014
शिरपूर ः हाडाखेड चेक पोस्टवर जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याच्या साठ्यासोबत उपस्थित अन्न व औषध विभागाचे अधिकारी, पोलिस.
---
धुळ्यात ८७ हजारांचा स्टार्च जप्त
साडेअकरा लाखांचा गुटखा पकडला; दोन गुन्हे दाखल
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १८ ः अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या मोहिमेंतर्गत अन्न व औषध विभागाने मोठी कारवाई केली आहे. यात शिरपूरमधील एका आस्थापनेतून संशयास्पद स्टार्चचा साठा जप्त करण्यात आला असून, दुसऱ्या एका कारवाईत प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची मोठी खेप पकडण्यात आली आहे. या दोन्ही कारवायांत एकूण १२ लाख १९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिरपूर येथील रतलाम इंटरप्राईजेस (प्लॉट नंबर - १, बालाजीनगर, मांडळ शिवार, शिरपूर) या दुकानावर पथकाने धाड टाकली. दुकानाची तपासणी करून स्टार्च मका या अन्नपदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. संशयित वाटल्याने ७२५ किलो वजनाचा, एकूण ८७ हजार रुपये किमतीचा स्टार्च साठा जप्त करण्यात आला.
गुटखा जप्त
दुसऱ्या एका कारवाईत इंदूरकडून पुण्याकडे जाणारे अशोक लेलँड कंपनीचे वाहन (एमएल ०१, एफ १२७५) हाडाखेड चेक पोस्ट (सांगवी, ता. शिरपूर) येथे तपासण्यात आले. या वाहनात राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व पान मसाला आढळून आला. शिरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या आवारात वाहनाची अधिक तपासणी केली असता, त्यात १२७५ पॅकेट, एकूण ११ लाख ३२ हजार ६०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व तंबाखूसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहन चालक नाजीर माजिद (रा. मेवात, ता. नुहू, हरियाणा) याच्याविरुद्ध सांगवी येथे गुन्हा दाखल करण्यात आला. ही संयुक्त कारवाई अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त (नाशिक) मंगेश माने, सहायक आयुक्त (अन्न) गो. वी. माहोरे यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, अरविंद राऊत व मंगेश भावसार यांनी पार पाडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.