नाशिक

गणूर येथे विवाहितेचा गळफास घेऊन मृत्यू

CD
चांदवड येथे विवाहितेचा गळफास घेऊन मृत्यू वडिलांचा जावयावर आरोप नसल्याचा जबाब सकाळ वृत्तसेवा गणूर (चांदवड), ता. १८ : चांदवड येथे एका विवाहितेने घरातील बेडरूममध्ये गळफास घेतल्याची घटना घडली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विवाहिता शेलकेनगर (चांदवड) येथे राहत होती. तिने घरातील बेडरूममध्ये गळफास घेतल्याचे आढळून आले. कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर तिला मृत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेहाचा व्हिसेरा सुरक्षित ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदन व व्हिसेरा तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मृत विवाहितेच्या वडिलांनी पोलिसांकडे जबाब देताना जावयाबाबत कोणताही आरोप नसल्याचे सांगितले असून, ‘माझा जावई देवमाणूस आहे. तो असे कुठलेही कृत्य करणार नाही,’ असे म्हटले आहे. या प्रकरणी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून चांदवड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. कोट या प्रकरणाचा पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आणि व्हिसेरा तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीबाबत निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. - अभिजित सोनवणे, पोलिस निरीक्षक, चांदवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT