नाशिक

चित्ररथा चित्ररथाचा शुभारंभचा शुभारंभ

CD
टुडे ४ : ॲंकर NSK26H30023 जळगाव : सेवा संकल्प अभियानाच्या चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करताना आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी भरत सोळुंके आदी. ------- आदिवासींच्या दारापर्यंत पोहोचणार शासकीय योजना ‘सेवा संकल्प’ चित्ररथ रवाना; आमदार सोनवणे, जिल्हाधिकारी घुगेंच्या हस्ते उद्घाटन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १९ : आदिवासी बांधवांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, वैयक्तिक तसेच सामूहिक लाभाच्या योजना आणि शासकीय सेवांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चित्ररथाचे उद्घाटन करून त्यास हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी भरत सोळुंके, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे, प्रवीण दाभाडे, संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आमदार सोनवणे यांनी अभियानास शुभेच्छा देत शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. सेवा संकल्प चित्ररथाच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत विविध योजनांची माहिती पोहोचण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी घुगे यांनी शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे सांगितले. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून आदिवासी भागातील नागरिकांना विविध योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि शासकीय सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. सेवा संकल्प चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध आदिवासीबहुल व दुर्गम भागांमध्ये भ्रमण करून नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि उपलब्ध सुविधांची माहिती देण्यात येणार आहे. चौकट योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन ‘शासनाच्या योजना – थेट लाभार्थ्यांपर्यंत’ या संकल्पनेनुसार कोणताही पात्र लाभार्थी शासनाच्या योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी अभियानाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येणार असल्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी सांगितले. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Kannad Rainfall: दीड महिन्यापासून पावसाची दडी; कन्नडमध्ये मका, सोयाबीन, कपाशी कोमेजली, शेतकरी संकटात

Pune News: लोहगड दरीत तरुण व्यावसायिकाच्या मृत्यूचे गूढ उकलले; ४० हून अधिक साक्षीदार, डिजिटल पुराव्यांची सांगड

अरविंद केजरीवालांसह कुटुंबातील ५ जणांना निवडणूक आयोगाकडून नोटीस, कारण काय?

SCROLL FOR NEXT