नाशिक

राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सवात शानभाग विद्यालय प्रथम

CD
NSK26H30028 जळगाव : राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सवात प्रथम क्रमांक पटकावलेल्या शानभाग विद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षकांचा संघ. विज्ञान नाट्य महोत्सवात ‘शानभाग’ प्रथम ‘क्षीरसागर ते महामंथन...’ नाट्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १९ : शिक्षण विभाग, पंचायत समिती यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सवात विवेकानंद प्रतिष्ठान संचलित कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. ‘क्षीरसागर ते महामंथन : महासागराचे पुनरुज्जीवन’ या विज्ञान नाट्याचे प्रभावी सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी ही कामगिरी केली. त्यामुळे विद्यालयाची जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प. न. लुंकड कन्या शाळेत १७ सप्टेंबरला झालेल्या या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांचे दहा संघ सहभागी झाले होते. शानभाग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कल्पकता, वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रभावी अभिनय आणि सामाजिक संदेश यांचा सुरेख मेळ साधत नाट्य सादर केले. पर्यावरण संवर्धन, जलस्रोतांचे संरक्षण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या पुनरुज्जीवनाचा संदेश नाट्यातून प्रभावीपणे मांडण्यात आला. या कार्यक्रमास जळगाव प्रशासनाधिकारी खलील शेख, गटशिक्षणाधिकारी अजित तडवी, जितेंद्र चिंचोले, तालुका विज्ञान समन्वयक गोपाळ महाजन, भाग्यश्री तळेले यांच्यासह विविध शाळांतील विज्ञान शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांचे मार्गदर्शन, तर वैशाली पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT