नाशिक

गणेश घाटावरील विसर्जन व्यवस्थेची मंत्री महाजन यांच्याकडून पाहणी

CD
टुडे पान ३ : मेन फिचर NSK26H30031 जळगाव : मेहरुण तलाव येथील गणेश घाटाच्या पाहणीप्रसंगी मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, महापौर दीपमाला काळे, आयुक्त आदित्य जिवने आदी नगरसेवक व अधिकारी. -- गणेश घाटावर मंत्री महाजन यांच्याकडून पाहणी विसर्जन व्यवस्थेचा आढावा; आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १९ : महापालिकेच्या वतीने आयोजित ‘जळगावचा मानाचा गणपती’ गणेशोत्सवांतर्गत शुक्रवारी (ता. १८) मानाच्या गणपतीची महाआरती भक्तिमय वातावरणात झाली. जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, महापौर दीपमाला काळे, आयुक्त आदित्य जिवने यांच्यासह पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी महाआरती करून गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मंत्री महाजन यांनी मनपाकडून राबविण्यात येत असलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे कौतुक केले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचे त्यांनी अभिनंदन केले. तसेच महाआरतीनंतर महाजन यांनी मेहरूण तलावावरील गणेश घाटाची पाहणी करून विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेतला. गणेशभक्तांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेले नियोजन, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापनाची तयारी तसेच विविध सोयी-सुविधांची त्यांनी माहिती घेतली. घाटावर कार्यरत असलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथकातील अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता अधिकारी-निरीक्षक आणि सफाई कामगारांच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले. चौकट अहोरात्र सेवा देणाऱ्यांचा गौरव यावेळी सेवा बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व सफाई कामगारांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गणेशोत्सव काळात अहोरात्र सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे महाजन यांनी विशेष कौतुक केले. महापालिकेच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी प्रशासनाला शुभेच्छा दिल्या. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेवक व महापालिका अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘प्रश्न विचारणं हा विद्यार्थ्यांचा स्वभाव’; ‘छात्रों की गूंज’मधून राहुल गांधींचं पुन्हा सरकारवर टीकास्र, नेमकं काय म्हणाले?

Muslim Family: दहा वर्षांपासून मुस्लिम कुटुंबाच्या घरी गौरीचा जागर; लोहाऱ्यात धार्मिक सलोख्याची अनोखी परंपरा

दीपिका-रणवीरने केली दुसऱ्या बाळाच्या जन्माची घोषणा, 'दुआ' बनली मोठी बहीण; पाहा पोस्टमध्ये काय लिहिलंय

Latest Marathi News Update : नागपुरातील इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाला डॉ. हेडगेवारांचं नाव

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून २५०० पानी चार्जशीट दाखल

SCROLL FOR NEXT