टुडे ३ ॲंकर
NSK26H30029
जळगाव : नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रबोधन मंडळातर्फे आयोजित व्याख्यानात शिक्षकांशी संवाद साधताना ज्येष्ठ व्याख्याते व रंगकर्मी शंभू पाटील. यावेळी उपस्थित प्राचार्या एस. एम. राणे, उपप्राचार्या सुजाता नेमाडे आदी.
----
शिक्षकांनी बदलत्या पिढीला समजून घेणे गरजेचे
ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांचे शिक्षकांशी संवादातून प्रबोधन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १९ : नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रबोधन मंडळाच्या वतीने शनिवारी (ता. १९) शिक्षकांसाठी व्याख्यान झाले. ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी शिक्षकांशी संवाद साधताना शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर भाष्य केले.
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात वाढत असलेला दुरावा, शिक्षकांवरील ऑनलाइन कामांचा वाढता बोजा आणि त्यामुळे कार्यसमाधानात होणारी घट याकडे श्री. पाटील यांनी लक्ष वेधले.
आजच्या ‘जेन झी’ पिढीला समजून घेताना शिक्षकांनी त्यांच्या मानसिकतेचा, आवडी-निवडींचा आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार करून त्यांना योग्य दिशा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी माध्यमाच्या शाळांचे महत्त्व, विद्यार्थ्यांशी प्रभावी संवाद आणि बदलत्या काळानुसार शिक्षकांनी स्वीकारावयाच्या भूमिका यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. व्याख्यानानंतर शिक्षकांशी संवाद साधत त्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमास विद्यालयाच्या प्राचार्या एस. एम. राणे, उपप्राचार्या सुजाता नेमाडे, उपमुख्याध्यापक व्ही. वाणी, पर्यवेक्षक व्ही. एस. सैंदाणे, पर्यवेक्षिका बी. एस. राणे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रबोधन मंडळ समितीने परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.