नाशिक

पाच लाखाची सुपारी घेवुन हत्येचा प्रयत्न करणारे ‘सुपारी किलर’ जेरबंद

CD
पान तीन मेन ----------------- 30045 नंदुरबार : संशयितांकडून जप्त करण्यात आलेले पिस्तुल तसेच कारवाई करणाऱ्या पथकासह जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप. खूनाचा प्रयत्न करणारी आंतरराज्य ''सुपारी किलर'' टोळी गजाआड नंदुरबार पोलिसांची कारवाई; ३ संशयितांना अटक, २ गावठी कट्टे, ६ काडतुसे जप्त सकाळ वृत्तसेवा नंदूरबार, ता. १९ : पाच लाख रुपयांची सुपारी घेऊन एका व्यापाऱ्याचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरराज्य ''सुपारी किलर'' टोळीला गजाआड करण्यात नंदुरबार शहर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटकेत असलेल्या तिघांकडून दोन गावठी कट्टे आणि ६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. देवेंद्र गोकुळदास बैरागी (वय ३४, रा. फाजरपुरा, उज्जैन, मध्य प्रदेश), अभयासिंग मोहनसिंग चव्हाण (वय ४६, रा. निकास चौक, उज्जैन, मध्य प्रदेश) आणि सत्तार मोहन ठाकरे (रा. म्हसावद, ता. शहादा, जि. नंदुरबार) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पैशांच्या वादातून हा खुनाचा कट रचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. शहरातील तंत्रनिकेतन महाविद्यालयाजवळ चौपाळे रस्त्यावर गोळीबार (फायरिंग) झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी हणमंत गायकवाड यांच्या सूचनेनुसार नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक भुनेश मराठे व अमोल देशमुख तपास करत होते. तपासादरम्यान छत्रपती हॉस्पिटलमागील मोकळ्या जागेत विनानंबर प्लेटच्या दुचाकीसह थांबलेल्या दोघांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ देशी पिस्तूल, ६ जिवंत काडतुसे, १ मोटरसायकल, ३ मोबाईल आणि १ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच त्यांच्याकडे म्हसावद-शहादा-नंदुरबार-निझर-तळोदा-अक्कलकुवा या मार्गांचा हस्तलिखित नकाशाही आढळून आला. जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, अपर अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, भुनेश मराठे, अमोल देशमुख, प्रशांत पाटील, जगदीश पाटील, विशाल नागरे, विनोद जाधव, राजेश येलवे, नरेंद्र चौधरी, पंकज महाले, राजेंद्र धनगर, जितेंद्र तोरवणे, राजेंद्र कटके, आनंद मराठे, रूपेश पगारे, ललित गवळी, राहुल राठोड, अमित भरबाड, नरेंद्र पाडवी, अनिल बसावे, बिबेक ठाकरे, बिनोद महाजन, बिद्धेश्वर बिरारी, संदीप सदाराब आणि निंबा वाघमोडे यांच्या पथकाने केली. --------- पैशांच्या वादातून ५ लाखांची सुपारी संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज मिश्रा ऊर्फ दादूशेठ (रा. शहादा) व सत्तार ठाकरे यांचा नंदुरबार येथील मुकेश अर्जुन चौधरी यांच्याशी पैशांचा वाद होता. त्यामुळे मुकेश चौधरी यांना जिवे मारण्यासाठी पंकज मिश्रा, सत्तार ठाकरे आणि रवी डाबी (रा. उज्जैन) यांनी देवेंद्र बैरागी व अभयासिंग चव्हाण यांना ५ लाखांची सुपारी दिली होती. यानंतर संशयितांनी मुकेश चौधरी यांच्यावर नंदुरबार शहरात रेकी केली होती. चौधरी जात असलेल्या काळ्या कारचा पाठलाग करून चौपाळा रस्त्यावर गाडी जवळ येताच त्यांनी गोळीबार केला; मात्र गाडीचा वेग जास्त असल्याने गोळी हवेत सुटली व चौधरी बालंबाल वाचले. त्यानंतर दिवसभरात पुन्हा संधी साधून हल्ला करण्यासाठी संशयित छत्रपती हॉस्पिटलमागे थांबले असताना पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. मुकेश चौधरींची हत्या केल्यानंतर संशयित बेहरा शेठ (रा. रायगड, ता. उच्छल, जि. तापी, गुजरात) याच्याकडे मुक्कामी जाणार होते. पोलिसांनी या कटात सहभागी असलेला मुख्य सूत्रधार सत्तार ठाकरे यालाही तातडीने ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Kannad Rainfall: दीड महिन्यापासून पावसाची दडी; कन्नडमध्ये मका, सोयाबीन, कपाशी कोमेजली, शेतकरी संकटात

Pune News: लोहगड दरीत तरुण व्यावसायिकाच्या मृत्यूचे गूढ उकलले; ४० हून अधिक साक्षीदार, डिजिटल पुराव्यांची सांगड

अरविंद केजरीवालांसह कुटुंबातील ५ जणांना निवडणूक आयोगाकडून नोटीस, कारण काय?

SCROLL FOR NEXT