धुळे : टुडे पान २ साठी...
--
बोरकुंड- रतनपुरा येथे रामदेवजी बाबांचा मेळा
--
सोमवारी जम्मा जागरण, तर मंगळवारी ग्यारस महाआरती
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १९ : बोरकुंड- रतनपुरा (ता. धुळे) येथील अतिप्राचीन व भाविकांच्या निस्सीम श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्री रामदेवजी बाबा मंदिरात यंदा भादवा महिन्याच्या दशमी व ग्यारसच्या पावन पर्वानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. या निमित्ताने भादवा मेळा, जम्मा जागरण, ग्यारसची महाआरती आणि महाप्रसाद कार्यक्रम होणार असून, जिल्ह्यातील तसेच परिसरातील सर्व बाबा भक्तांनी व भाविकांनी परिवारासह उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
-
या मंदिराला दीर्घ धार्मिक व ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. सुमारे ५०० वर्षांहून अधिक काळापूर्वी राजस्थानातील गोटण गावातील बंब परिवारातील चार ज्येष्ठ जैन बंधूंनी श्रद्धा व भक्तिभावाने श्री रामदेवजी बाबा भगवान यांच्या पादुका (पगलिया) मस्तकावर धारण करून रामदेवरा (रुणिचा) येथून बोरकुंडपर्यंत पायी प्रवास केला होता. बोरकुंड येथे आगमन झाल्यावर त्यांनी मंदिर उभारून त्या पवित्र पगलियाची विधिवत स्थापना केली. तेव्हापासून या पवित्र स्थानी भक्ती, श्रद्धा आणि धार्मिक परंपरेची अखंड ज्योत प्रज्वलित आहे. तसेच मंदिराच्या गाभाऱ्यातील बाबांच्या पगलियावर सूर्यदेवाची पहिली किरणे पडण्याचे मनोहारी दर्शन भाविकांना अनुभवता येते, जे या मंदिराचे एक विशेष वैशिष्ट्य मानले जाते. यंदाच्या नियोजित कार्यक्रमांनुसार सोमवारी (ता. २१) दुपारी तीनला जम्मा जागरण होणार आहे. पुणेस्थित कन्हैया आगिवाल हे जम्मा जागरण प्रस्तुत करतील. यादरम्यान भक्तिमय वातावरणात बाबा रामदेवजींची आराधना, भजन व धार्मिक कार्यक्रम पार पडतील. मंगळवारी (ता. २२) सकाळी अकराला ग्यारसच्या पावन पर्वानिमित्त महाआरती होईल. या महाआरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादी होणार आहे. समाजबांधवांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री रामदेवजी बाबा भक्त जितु जैन बंब यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.