नाशिक

‘सिटीलिंक’ अन्‌ बसेसच्या मार्गांत डिसेंबरपर्यत बदल

CD
मेन सिटीलिंक अन्‌ बसच्या मार्गांत डिसेंबरपर्यंत बदल वाहतूक शाखेकडून अधिसूचना; वाहतूक सुरळीत होण्यास मदत सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १९ : निमाणी, नाशिक रोड बसस्थानकाच्या काम हाती घेण्यात येणार असल्याने, पुढील तीन महिन्यांसाठी निमाणी, नाशिक रोड बसस्थानक पूर्णपणे रिक्त केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सिटीलिंक बस फेऱ्या, मार्ग आणि थांब्यांमध्ये २१ सप्टेंबर ते २० डिसेंबर कालावधीसाठी महत्त्वाचे बदल केले आहेत. तसेच, राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या मार्गातही बदल केले आहेत. यात प्रामुख्याने निमाणी येथून सुटणाऱ्या बस मेळा व नवीन सीबीएस ठक्कर बाजार बसस्थानकातून सुटतील. शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी वाहतूक नियंत्रणाची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. .... * सिटीलिंक बसचे नवीन मार्ग व फेऱ्या -​नाशिक रोड ते त्र्यंबकेश्वर : ३० बसद्वारे एकूण १८८ फेऱ्या. या बस नाशिक रोड रेल्वे स्टेशनावरूनच त्र्यंबकेश्वरसाठी ये-जा करतील. -​नाशिक रोड ते दिंडोरी : १५ बसेसद्वारे १२४ फेऱ्या. या बस रेल्वे स्टेशनवरून सुटतील. * ​रेल्वे प्रवाशांसाठी विशेष सोय (पंचवटी एक्सप्रेस व रात्रीची वेळ) : -​रात्री ९. ४५ वाजता पंचवटी एक्स्प्रेसने येणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे स्टेशनवर एकाच वेळी ५ बस उपलब्ध राहतील. -​रात्री रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची सोय म्हणून ५ बस रात्रभर रेल्वे स्टेशनवरून शहरात जाण्यासाठी सुरू राहतील. *​तपोवन ते सिन्नर फेरी : बिटको चौकापासून पुढे नाशिकरोड पोलीस ठाणे, विभागीय आयुक्त कार्यालय टी-पॉइंट ते उड्डाणपूल अप रॅम्पवरून सिन्नर फाटा मार्गे जातील. परत येताना सिन्नर फाटा, मारुती मंदिर, उड्डाणपूल डाऊन रॅम्प, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिटको चौक व दत्तमंदिर चौक मार्गे धावतील (एकूण १५ बसेस / ४४ फेऱ्या). *​शहरातील इतर मार्गांवरील ५०१ फेऱ्या : - ​जाताना : नाशिक रोड सिटीलिंक बस आगारातून सुटून सिन्नर फाटा - उड्डाणपूल डाऊन रॅम्प - छत्रपती शिवाजी महाराज चौक - बिटको चौक - दत्तमंदिर चौक मार्गे शहराकडे जातील. -​येताना : शहराकडून येताना दत्तमंदिर चौकातून थेट उड्डाणपुलावरून सिन्नर फाटा व तेथून नाशिकरोड सिटीलिंक आगारात जातील. ................ प्रयोग कायम ठेवण्याचा निर्णय निमाणी बसस्थानकावर काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने एसटी महामंडळाच्या विनंतीवरून १२ सप्टेंबरला ८ दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर बसचे मार्ग बदलले होते. दरम्यान, द्वारका सर्कलमधील उड्डाणपुलाखालील दोन्ही लेन वाहतुकीसाठी खुल्या झाल्यामुळे या बदलांमुळे वाहतूक कोंडीत मोठी घट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे एसटी महामंडळाच्या मागणीनुसार हा प्रयोग पुढील तीन महिन्यांसाठी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ..... महामार्गावरील बदल यापूर्वी महामार्ग बसस्थानकातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या एसटी बसची वाहतूक मुख्य रस्त्यावरील एकाच गेटवरून होत होती. त्यामुळे बस रस्ता ओलांडताना वारंवार वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर कोंडी होत होती. या समस्येवर मात करण्यासाठी पोलिस प्रशासनाने १९ ऑगस्ट ते १८ सप्टेंबरदरम्यान, प्रायोगिक तत्त्वावर एसटी बससाठी प्रवेश आणि बाहेर पडण्याचे वेगळे मार्ग निश्चित केले होते. या प्रायोगिक बदलांमुळे मुंबई नाका परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन वाहतूक सुरळीत व सुरक्षित होण्यास मदत झाली. त्यामुळे हाच नियम पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय शहर पोलिस वाहतूक शाखेने घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune District News: वसतिगृहातून तीन अल्पवयीन विद्यार्थी गायब; १८ दिवस उलटूनही ठावठिकाणा नाही, जुन्नर पोलिसांकडून शोध सुरू

Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

रविवारी गुरुचा अश्लेषा नक्षत्रात प्रवेश; 'या' ७ राशींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी

Nilanga Drought: निसर्गाची अवकृपा अन् कृषी विभागाची आकडेवारी; निलंग्यात खरीप पिकांचे १०० टक्के नुकसान, अहवालात ७० टक्केच नोंद

Latest Marathi News Update : नागपुरातील इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाला डॉ. हेडगेवारांचं नाव

SCROLL FOR NEXT