नाशिक

चॅलेंजर ट्रॉफीने क्रिकेट हंगामाचा शुभारंभ

CD
फोटो : H30064 नाशिक : जिल्‍हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित चॅलेंजर ट्रॉफी स्‍पर्धेतील सामन्‍याची नाणेफेक करून सुरुवात करताना उपस्‍थित मान्‍यवर. ----------- चॅलेंजर ट्रॉफीने क्रिकेट हंगामास प्रारंभ १४ वर्षाखालील वयोगटासाठी स्‍पर्धेचे आयोजन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १९ : जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या २०२६-२७ या नव्या क्रिकेट हंगामास प्रारंभ झाला आहे. परमेश्वर परमसेवा फाऊंडेशनचे अभिषेक चौहान यांच्या हस्ते हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्‍या समारंभात १४ वर्षांखालील वयोगटासाठीच्या चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. याप्रसंगी अभिषेक चौहान म्‍हणाले, की खेळामध्ये यश व अपयश येत राहाते. परंतु नेहमी जिद्दीने खेळ केल्‍यास खेळाडूंची कामगिरी नेहमी उंचावत राहाते. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष धनपाल शहा यांनी प्रास्ताविकात या दोन दिवसीय कसोटी स्वरूप स्पर्धेचे महत्त्व विशद केले. संघटनेचे सहसचिव चंद्रशेखर दंदणे व खजिनदार हेमंत देशपांडे उपस्थित होते. कुणाल कातकाडे यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेतील चारही संघांना नाशिकचे दिवंगत क्रिकेटपटू रमेश वैद्य, बाबा शेट्टी, शेखर गवळी व रमेश संवत्सरकर यांची नावे दिली आहेत. पहिल्या दिवशी रमेश वैद्य संघ विरुद्ध बाबा शेट्टी संघ तसेच शेखर गवळी संघ विरुद्ध रमेश संवत्सरकर संघ यांचे दोनदिवसीय साखळी सामने सुरु झाले. समारंभास नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे हेतल पटेल, राघवेंद्र जोशी, शिवाजी उगले, निखिल टिपरी, विक्रांत मते, बाळासाहेब मंडलिक, डॉ.अनिरुद्ध भांडारकर, नितीन धात्रक निवड समिती सदस्य सतीश गायकवाड, फय्याज गंजीफ्रॉकवाला, सीईओ रतन कुयटे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: लोहगड दरीत तरुण व्यावसायिकाच्या मृत्यूचे गूढ उकलले; ४० हून अधिक साक्षीदार, डिजिटल पुराव्यांची सांगड

अरविंद केजरीवालांसह कुटुंबातील ५ जणांना निवडणूक आयोगाकडून नोटीस, कारण काय?

iPhone युजर्ससाठी WhatsAppचे खास गिफ्ट; मेसेज अन् चॅनेल अपडेट्स शोधणे होणार सोपे! पाहा नवे 'सर्च' फीचर...

Nagpur Crime: नागपुरात मकोका आरोपीचा रुग्णालयातून पलायन; मेडिकल कॉलेजच्या शौचालयाची खिडकी तोडून फरार

Latest Marathi News Update : IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संताप; मुख्य गेटबाहेर दिवे लावून आंदोलन

SCROLL FOR NEXT