नाशिक

डॉ. निलेश जेजुरकरांना २२ पर्यंत कोठडी

CD
डॉ. नीलेश जेजूरकर यांना २२ पर्यंत पोलिस कोठडी आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा जेजूरकर आत्महत्याप्रकरणी तपासाला वेग सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १९ : जिल्हा रुग्णालयातील आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा जेजूरकर यांच्या आत्महत्येप्रकरणी संशयित पती व मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नीलेश जेजूरकर यांना शहर गुन्हे शाखेने अटक केली. न्यायालयाने त्यांना २२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. स्वाती चव्हाण यांना शनिवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, त्या चौकशीला उपस्थित राहिल्या नाहीत. डॉ. मनीषा जेजूरकर यांनी ६ मार्चला गंगापूर रोड परिसरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांची बहीण रोहिणी वैभव थोरात यांच्या फिर्यादीनुसार, डॉ. नीलेश जेजूरकर यांनी मनीषा यांना आत्महत्येस प्रवृत्त केले किंवा त्यांच्या मृत्यूमागे त्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉ. जेजूरकर पसार झाले होते. जिल्हा न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शुक्रवारी (ता. १८) शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने त्यांना शहरातून अटक केली. शनिवारी त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने २२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तपासात विविध बाबींची पडताळणी फिर्यादीत डॉ. नीलेश जेजूरकर पत्नीची उपेक्षा करीत असल्याचे, तसेच एका महिला डॉक्टरच्या संपर्कात अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या आरोपांची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. त्यासाठी डॉ. जेजूरकर यांचा मोबाईल व त्यातील संभाषण, संदेश तसेच अन्य डिजिटल माहिती तपासली जाण्याची शक्यता आहे. घटनेच्या आदल्या दिवशी दोघांमध्ये वाद झाला होता का, वादाचे कारण काय होते, तसेच त्यादिवशी झालेल्या एका विवाहातील कथित प्रकाराचीही चौकशी केली जाणार आहे. डॉ. मनीषा यांनी मृत्यूपूर्वी कोणतीही सुसाइड नोट लिहिली होती का, याचाही तपास केला जात आहे. या गुन्ह्याचा तपास सरकारवाडा विभागाचे सहायक पोलिस आयुक्त प्रमोद वाघ करीत आहेत. डॉ. चव्हाण चौकशीला गैरहजर या प्रकरणात जिल्हा रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. स्वाती चव्हाण यांचे नावही फिर्यादीतील आरोपांमध्ये आल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांची चौकशी करण्यात आली होती. शनिवारी पुन्हा चौकशीसाठी त्यांना पाचारण करण्यात आले होते. मात्र, त्या उपस्थित राहिल्या नाहीत. फिर्यादीत करण्यात आलेल्या आरोपांची पोलिसांकडून पडताळणी सुरू असून, त्यात तथ्य आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT