नाशिक

पावसाची उसंतीने आरास पाहण्यासाठी भाविकांची गदी

CD
सेकंड मेन फोटो : B60940 पावसाच्या उसंतीने आरास पाहण्यासाठी गर्दी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १९ : गणेशोत्सव अंतिम टप्प्यात पोचला असून गणराय, आकर्षक देखावे, आरास पाहण्यासाठी शनिवारी (ता. १९) भाविकांची गर्दी झाली होती. गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोचलेला असतानाच, शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी पावसाने हजेरी लावली होती. परंतु शनिवारी (ता. १९) पावसाने उसंत दिल्याने भाविकांचा हिरमोड झाला नाही. त्यामुळे भाविकांनी देखावे, आरास पाहण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत गर्दी होती. यामुळे संपूर्ण शहरालाच यात्रेचे स्वरूप आले होते. दरम्यान, रविवारी (ता. २०) आरास व भव्य गणरायाला पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाचा शनिवारी सहावा दिवस. यंदा लाडके गणराया १२ दिवस असल्याने भाविकांमध्येही उत्साह आहे. गणेशोत्सवातील आकर्षक देखावे, आरास पाहण्यासाठी शनिवारी भाविकांनी गर्दी केली. मध्यरात्रीपर्यंत मध्यवर्ती बाजारपेठेतील रस्ते गर्दी फुलून गेले होते. भालेकर मैदानावरील देखावे पाहण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. मेन रोड, रविवार कारंजा, अशोकस्तंभ या परिसरातील गणेश मंडळांचे आकर्षक देखावे भाविकांसाठी केंद्रबिंदू ठरले. तर, उपनगरी परिसरातील इंदिरानगर, सातपूर, अंबड, नाशिकरोड या परिसरातील आकर्षक देखावे पाहण्यासाठीही भाविकांनी गर्दी केली. --चौकट गर्दीमुळे वाहतूक वळविली स्मार्ट रोडवर भाविकांची गर्दी झाल्याने शहर वाहतूक शाखेकडून या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली होती. अशोकस्तंभ, रविवार कारंजा येथील गणेश मंडळांची आकर्षक देखावे पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. त्यामुळे मेहेर सिग्नलकडून रविवार कारंजाकडे जाणारी वाहतूक अशोक स्तंभावरून गंगापूर रोडकडे वळविण्यात आली. तर गंगापूर रोडकडून अशोकस्तंभाकडे येणारी वाहतूक रामवाडी पुलाकडे वळविण्यात आली होती. भालेकर मैदानाकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बॅरिकेटींग करून बंद केले होते. ठिकठिकाणी वाहतूक पोलिस तैनात होते. तर गर्दीच्या ठिकाणी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: लोहगड दरीत तरुण व्यावसायिकाच्या मृत्यूचे गूढ उकलले; ४० हून अधिक साक्षीदार, डिजिटल पुराव्यांची सांगड

अरविंद केजरीवालांसह कुटुंबातील ५ जणांना निवडणूक आयोगाकडून नोटीस, कारण काय?

iPhone युजर्ससाठी WhatsAppचे खास गिफ्ट; मेसेज अन् चॅनेल अपडेट्स शोधणे होणार सोपे! पाहा नवे 'सर्च' फीचर...

Nagpur Crime: नागपुरात मकोका आरोपीचा रुग्णालयातून पलायन; मेडिकल कॉलेजच्या शौचालयाची खिडकी तोडून फरार

Latest Marathi News Update : IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संताप; मुख्य गेटबाहेर दिवे लावून आंदोलन

SCROLL FOR NEXT