पेट्रोल पंपांवरील ‘डिजिटल’ व्यवहार शुल्काला फामपेडाचा विरोध
दोन हजारांवरील व्यवहारांवरील प्रस्तावित पाच रुपये शुल्कही रद्द करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१९ : पेट्रोल पंपांवरील युपीआय व अन्य डिजिटल पेमेंट व्यवहारांवर प्रस्तावित मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर) किंवा कोणतेही ठराविक व्यवहार शुल्क आकारू नये, अशी मागणी ‘फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन’ने (फामपेडा) केली आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री, पेट्रोलियम मंत्री, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तसेच प्रमुख तेल विपणन कंपन्यांच्या संचालकांना निवेदन देण्यात आले आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला आहे. पेट्रोल व डिझेल ही अत्यावश्यक सेवा असून, त्यांचे किरकोळ दर सरकार व तेल कंपन्यांच्या धोरणानुसार ठरतात. त्यामुळे डीलर्सना डिजिटल व्यवहारांचा अतिरिक्त खर्च इंधनाच्या दरात किंवा स्वतःच्या मार्जिनमध्ये वाढ करून भरून काढता येत नाही.
दोन हजार रुपयांवरील युपीआय व्यवहारांवर प्रस्तावित पाच रुपये शुल्क किंवा कोणताही एमडीआर लागू झाल्यास त्याचा थेट परिणाम डीलर्सच्या मर्यादित मार्जिनवर होईल. पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार होत असल्याने या शुल्काचा आर्थिक भार डीलर्सवर पडेल, असा दावा फामपेडाने केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.