नाशिक

सिंहस्थ ध्वजारोहणाचा मुहूर्त ठरला

CD
सिंहस्थाचा बिगुल ३१ ऑक्टोबरला! दुपारी १२.०२ ला नाशिक-त्र्यंबकेश्वरात ध्वजारोहण; राष्ट्रपतींसह मान्यवरांची उपस्थिती सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १९ : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रारंभाचा मुहूर्त ठरला आहे. येत्या ३१ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी नाशिकच्या रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तावर एकाचवेळी ध्वजारोहण होणार आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र व राज्यातील वरिष्ठ मंत्री आणि प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सिंहस्थाचे पर्व यंदा २२ महिन्यांचे असून, ध्वजारोहणाने त्याचा औपचारिक प्रारंभ होईल. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी (ता. १९) ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह केंद्र व राज्यातील ज्येष्ठ मंत्री सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे एकाच वेळी ध्वजारोहण असल्याने मान्यवरांची दोन्ही ठिकाणी विभागणी केली जाणार आहे. मात्र, राष्ट्रपती मुर्मू नेमक्या कोणत्या ठिकाणी उपस्थित राहणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पावसामुळे सिंहस्थाच्या कामांना काहीसा विलंब झाला असला, तरी पुढील वर्षी होणाऱ्या प्रमुख अमृतस्नानापूर्वी सर्व कामे पूर्ण केली जातील, अशी ग्वाही महाजन यांनी दिली. ध्वजारोहण सोहळ्यासाठी वाहतूक, वाहनतळ, गर्दी नियंत्रण, सुरक्षा, आरोग्य व स्वच्छतेचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ध्वजारोहण सोहळ्याची रूपरेषा - नाशिकमध्ये एक लाख भाविकांच्या उपस्थितीचे नियोजन - त्र्यंबकेश्वरमध्ये ध्वजारोहणानंतर जाहीर सभा - नाशिकमध्ये सायंकाळी दीपप्रज्वलन - नाशिकमध्ये तीनदिवसीय कार्यक्रम - नाणिजधामच्या भाविकांची नाशिकमध्ये रॅली - सिंहस्थ ध्वजाच्या मिरवणुकीचे नियोजन१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT