राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रश्नांवर गुरुवारी बैठक
जुनी पेन्शन, निवृत्तिवेतनातील त्रुटींसह प्रलंबित मागण्यांवर होणार चर्चा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १९ : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे प्रमुख पदाधिकारी गुरुवारी (ता. २४) नाशिक दौऱ्यावर येणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दुपारी १२ वाजता बैठक होणार आहे. जिल्ह्यातील विविध विभागांतील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या, अडचणी व प्रश्नांवर बैठकीत चर्चा होणार आहे.
महासंघाच्या शासनदरबारी प्रलंबित मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना, सुधारित निवृत्तिवेतन योजनेतील त्रुटींचे निवारण, केंद्राप्रमाणे दोन वर्षांची बालसंगोपन रजा आणि सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याचा समावेश आहे. कर्तव्य बजावताना अधिकारी-कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले, अश्लील शिवीगाळ, दमबाजी आणि शासकीय कामकाजात निर्माण होणारे अडथळे यावरही बैठकीत चर्चा होणार आहे.
अधिकाऱ्यांच्या समस्या व सूचना जाणून घेऊन प्रलंबित मागण्यांबाबत पुढील दिशा ठरविणे, तसेच हक्कांचे संरक्षण व प्रशासकीय बळकटीकरणासाठी महासंघाची राज्यस्तरीय धोरणे अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविणे, हा दौऱ्याचा उद्देश आहे.
महासंघाचे अध्यक्ष नितीन काळे, सरचिटणीस समीर भाटकर, दुर्ग महिला मंचाच्या अध्यक्षा स्वाती काळे आणि राज्य संघटक रमेश जंजाळ उपस्थित राहणार आहेत. संलग्न खाते संघटनांचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व विभागांतील राजपत्रित अधिकाऱ्यांनी बैठकीस उपस्थित राहून आपल्या समस्या व सूचना मांडाव्यात, असे आवाहन नाशिक जिल्हा समन्वय समितीने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.