नाशिक

पुरातन नाणी, नोटा अन् दुर्मीळ वस्तूंचे प्रदर्शन

CD
ॲंकर --------- फोटो येणार आहे जळगाव : ---------------------------- पुरातन नाणी, नोटा अन् दुर्मीळ वस्तूंचे प्रदर्शन ------- इतिहासप्रेमींसह विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारसा अनुभवण्याची संधी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २० : पुरातन व दुर्मीळ वस्तू, नाणी, नोटा व टपाल तिकिटांचा अनोखा संग्रह पाहण्याची संधी जळगावकरांना उपलब्ध झाली आहे. अ. मजीद जकेरिया बीबा परिवार व मेहरुण येथील इकरा एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पुरातन व दुर्मीळ वस्तू, नाणी व नोटा’ या भव्य प्रदर्शनाचे शुक्रवारी (ता. १९) उद् घाटन झाले. दरम्यान, हे प्रदर्शन सोमवार(ता.२१)पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत मेहरुण येथील इकरा एच. जे. थीम महाविद्यालयात सुरु आहे. फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रा. मारुती जाधव यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद् घाटन झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अ. करीम सालार होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. अरुण धांडे, हाजी कादर टिक्की, एजाज मलिक, जळगावचे उपमहापौर मनोज चौधरी, प्रा. सुरेश पांडे, दत्तात्रय चौधरी, जगतराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. सालार म्हणाले की, जुनी नाणी, नोटा व ऐतिहासिक वस्तू या केवळ संग्रहातील वस्तू नसून, आपल्या इतिहासाचे, संस्कृतीचे, सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे जीवंत दस्तऐवज आहेत. अशा प्रदर्शनांमुळे नव्या पिढीला आपल्या ऐतिहासिक वारशाची जवळून ओळख होते व तो जतन करण्याची प्रेरणा मिळते. नागरिकांना आवाहन या प्रदर्शनात विविध कालखंडांतील दूर्मीळ व पुरातन नाणी, जुन्या नोटा, टपाल तिकिटे, विविध ऐतिहासिक वस्तू मांडण्यात आल्या आहेत. संग्रहकर्ता अ. मजीद जकेरिया बीबा यांच्या संग्रहातील या वस्तूंमुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना इतिहास व सांस्कृतिक वारसा प्रत्यक्ष अनुभवता येत आहे. सूत्रसंचालन महाविद्यालयाचे प्राचार्य विकार अहमद यांनी केले. जुबेर यांनी आभार मानले. इतिहास व संस्कृतीप्रेमी, विद्यार्थी, पालक व नागरिकांनी या अनोख्या प्रदर्शनाला भेट देऊन दूर्मीळ वस्तूंचा संग्रह पाहावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitesh Rane, Disha Salian case : आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणावर नितेश राणे तोंड सांभाळणार, थेट सांगून टाकलं 'धन्यवाद'...

Pathardi Bribery Case : पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलिस अटकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT