शहर टुडे पान चारसाठी
NSK26H30105
सोलापूर : प्रल्हाद सोनवणे यांना राज्यस्तरीय चालकरत्न पुरस्कार देऊन सन्मान करताना वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे पदाधिकारी.
--------------
जिल्ह्यातील ११ रिक्षाचालकांचा विशेष सन्मान
------
शहरातील प्रल्हाद सोनवणे यांना राज्यस्तरीय चालकरत्न पुरस्कार प्रदान
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २० : वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने चालक दिनानिमित्त सोलापूर येथे चालकरत्न पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच झाला. यात जिल्ह्यातील ११ रिक्षाचालकांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जळगाव शहरातील प्रल्हाद सोनवणे यांना राज्यस्तरीय चालकरत्न पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यात राज्यभरातील २७ जिल्ह्यांमधून १२७ रिक्षाचालकांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल चालकरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रल्हाद सोनवणे हे ३० वर्षांपासून ऑटोरिक्षाचालक म्हणून शहरात प्रवाशांना सेवा देत आहेत. ऑटो रिक्षा चालक मालकांच्या वेदना समजून त्यांच्यासह परिवाराचा विकास व्हावा, यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्हा शाखेची स्थापना केली. वाहतूक संघटना संयुक्त महासंघाकडून प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद व उपाध्यक्ष इरफान शेख यांच्या हस्ते सोनवणे यांच्यासह जिल्ह्यातील ११ ऑटो रिक्षाचालकांना चालकरत्न पुरस्कार सोहळ्यात विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. याशिवाय तन्वीर शफीउल्ला, नरेंद्र पाटील, शेख नबी शेख करीम कुरेशी, मुश्ताक शाह, तौसिफ अहमद अल्ताफ शेख, शाम सूर्यवंशी, मुश्ताक शेख मुख्तार, प्रमोद सपकाळे, संजय शिंदे व कैलास साळुंखे यांचाही सन्मानीत करण्यात आलेल्यांत समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.