मेन
फोटो : B60943
श्वास गुदमरला; रस्ते धुळीने व्यापले
श्वसन, डोळ्यांचे विकार बळावले; हवा प्रदूषित; वाहनचालक बेजार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २० : शहरातील खड्ड्यांमधील वाळलेला चिखल आता हवेत उडू लागल्याने नाशिककरांचा श्वास गुदमरला आहे. शहरात चोहोबाजूला उडालेल्या धुळीच्या धुरळ्यामुळे दुचाकी चालवताना कसरत करावी लागत असून, हवा प्रदूषित झाल्याने डोळ्यांचे जळजळणे आणि फुप्फुसाचे गंभीर विकार बळावले आहेत. शहरात धूळ आणि प्रदूषणाशी संबंधित रुग्णांचे प्रमाण अचानक वाढले असून रुग्णालये हाऊसफुल्ल होऊ लागली आहेत.
...
शहरभर रस्त्यांची खोदकामे सुरू आहेत. सततच्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून डासांचा प्रादूर्भाव वाढला. तर, रस्त्यावर आलेला चिखल आता कोरडा झाला. आता वाहनांच्या रहदारीमुळे वाळलेल्या मातीचे धुलीकण हवेमध्ये मिसळले आहेत. रस्त्यावर धुरळा उडाला आहे. यामुळे रहदारीमध्ये वाहने चालविताना, विशेषतः दुचाकीचालकांना कसरत करावी लागत आहे. या धुलीकणांमुळे आरोग्याच्याही समस्या उद्भवत आहेत. सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये या धुलीकणांमुळे होणाऱ्या इन्फेक्शन झालेल्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहेत. सर्वसामान्यांना धुलीकण श्वसनामुळे शरीरात जाऊन सर्दीचा त्रास होतो आहे. दमा असलेल्यांना श्वसनाचा त्रास होतो आहे. डोळ्यांमध्ये धुलीकण जाऊन इजा होत असून, डोळ्यांची जळजळ होते आहे. एकूणच, धुळीकणांमुळे आरोग्याच्या गंभीर स्वरुपाच्या तक्रारी वाढल्या आहेत. धुलीकण श्वासातून शरीरात जाऊन सर्दी होते. हेच धुलीकण श्वसनातून फुप्फुसात जाऊन निमोनिया होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच, धुळीची ॲलर्जी असलेल्यांना यामुळे श्वसनाचा त्रास होऊन त्यांना हृदयाचा झटकाही येऊ शकतो. दमा असलेल्यांना यामुळे श्वास कोंडून गंभीर स्वरूपाचा त्रास होतो आहे. धुलीकण डोळ्यात जाऊन इन्फेक्शन होऊन डोळ्यांना इजा होऊ शकते. धुळींमुळे डोळ्यांची जळजळ होते. विशेषतः लहान मुलांमध्ये सर्दीचा त्रास होत असून, रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या मुलांची संख्या लक्षणीय आहे. औषध विक्रेत्यांकडे धुळीमुळे डोळ्यांना त्रास होत असल्याने त्यावरील ड्रॉप खरेदीची मागणी लक्षणीयरित्या वाढली आहे.
....
सोशल मीडियावर मीम्स्
शहरातील धुलीकणांनी होत असलेल्या त्रासाबाबत सोशल मीडियावर उपहासात्मक मीम्स शेअर केले जात आहे. गणेशोत्सव असल्याने सायंकाळी आरास पाहण्यासाठी निघालेल्या अनेक भाविकांना धुळीमुळे डोळ्यांना त्रास झाला. त्यावर एका भाविकाने लोकप्रतिनिधींनी गणेशोत्सवानिमित्ताने धुळीपासून संरक्षणासाठी भाविकांना गॉगल्सचे वाटप करावे असा संदेश व्हायरल केला. तर काहींनी रस्त्यांवरील खड्डयांमुळे कमेरेचा त्रास, वाहनाच्या शॉकबचे नुकसान यासाठी मनपाने आर्थिक मदत करावी असेही संदेश व्हायरल केले आहेत.
--कोट
फोटो : H30112
धुलीकण श्वसनातून शरीरात जाऊन आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. विशेषतः फुफ्फुस, श्वसन व दम्याचे त्रास होऊन गंभीर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकते. खोकला, सर्दी वाढून शरीरात इन्फेक्शन होते. त्यामुळे नाका-तोंडातून धुळ शरीरात जाणार नाही व डोळ्याचे संरक्षण व्हावे असे उपाय करावेत.
- डॉ. नितीन चिताळकर, इएनटी सर्जन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.