धुळे : टुडे पान २ साठी... अँकर
--
फोटो क्रमांक : 30123
धुळे : वंदे मातरम् प्रतिष्ठानच्या गणपती बाप्पाच्या दर्शनवेळी उपस्थित पालकमंत्री जयकुमार रावल यांचा सत्कार करताना प्रतिस्थानचे अध्यक्ष श्यामकांत बोरसे, सुमित बोरसे. शेजारी अनुप अग्रवाल, मायादेवी परदेशी, डॉ. सुभाष भामरे, गजेंद्र अंपळकर आदींसह पदाधिकारी.
--
गणेशोत्सवातून समाजप्रबोधनाची परंपरा बळकट करा
--
जयकुमार रावल : ‘बाप्पा डॉट ओआरजी’त सहभागी होण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २० : सार्वजनिक गणेशोत्सवाला लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधनाची जोड दिली. हीच परंपरा पुढे नेत धुळे शहरातील गणेश मंडळांनी सामाजिक प्रश्नांवर जनजागृतीचे कार्य अधिक व्यापक करावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. शनिवारी (ता. १९) शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन त्यांनी श्री गणरायाचे दर्शन घेतले. तसेच, ‘बाप्पा डॉट ओआरजी’ डिजिटल चळवळ व ‘लोकसंवाद २०२६’ अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
-
पालकमंत्री रावल यांनी विविध मंडळांच्या सजीव देखाव्यांची पाहणी करत बालकलाकार व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. ‘हिंदू एकता मित्रमंडळ’ गेल्या ४७ वर्षांपासून संवेदनशील विषयांवर देखावे सादर करत आहे, तर ‘जय श्री कृष्ण मित्र मंडळा’च्या दहीहंडीने धुळ्याची ओळख महाराष्ट्रात निर्माण केली आहे, असे ते म्हणाले. ‘श्रीमंत लालबागचा राजा’ गणपतीचे दर्शन घेऊन त्यांनी धुळेकरांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली. महापौर मायादेवी परदेशी, आमदार अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी महापौर जयश्री अहिरराव, चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, मुंबई बाजार समितीचे संचालक रावसाहेब गिरासे, हिंदू एकता मित्र मंडळाचे हिरामण गवळी, जय श्री कृष्ण मित्र मंडळाचे भिकन वराडे, मरिमाता मित्र मंडळाचे चेतन गवळी, क्रांतीवीर राजगुरू मित्र मंडळाचे विक्की परदेशी, गणराज प्रतिष्ठानचे राहुल अग्रवाल, ललित आहुजा, जय झुलेलाल मित्र मंडळाचे धिरज परदेशी, जय श्री कृष्ण मित्र मंडळाचे (सिंचन भवन) प्रदीप बैरागी, वंदे मातरम् ग्रुपचे शामकांत बोरसे आणि प्रिन्स ग्रुपचे नगरसेवक कृपेश नांद्रे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
-
‘बाप्पा डॉट ओआरजी’चे आवाहन
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी गणेशोत्सवाचा वारसा, कला, खाद्यसंस्कृती व आरत्यांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यासाठी ‘bappa.org’ वर छायाचित्रे व व्हिडिओ अपलोड करण्याचे निर्देश दिले. ‘बाप्पा डॉट ओआरजी’ उपक्रमाच्या जिल्ह्यातील प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी शरद पवार, उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप, जिल्हा नियोजन अधिकारी संतोष वानखेडे, धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र अग्रवाल, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. गिरीष पाटील, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत दुसाने, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैभव बाचकर यांच्यासह विविध विभाग व यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सवाला युनेस्कोचा अमूर्त सांस्कृतिक वारसा दर्जा मिळण्यासाठी हे महत्त्वपूर्ण ठरेल, असे त्यांनी सांगितले. सहभाग नोंदवणाऱ्यांना ‘डिजिटल कल्चरल प्रिझर्वर प्रमाणपत्र’ दिले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.