नाशिक

जिल्हाधिकारी कुटुंबाचा कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेशजिल्हाधिकारी कुटुंबाचा कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेशजिल्हाधिकारी कुटुंबाचा कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

CD
ॲंकर ---- NSK26H30128 जळगाव : पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश मूर्तीचे शासकीय निवासस्थानी विसर्जन करताना जिल्हाधिकारी रोहन घुगे व डॉ. मिहिका घुगे. --------------- जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यावरण संवर्धनाचा संदेश ------ पर्यावरणपूरक पद्धतीने श्रीगणेश मूर्तीचे शासकीय निवासस्थानी विसर्जन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२० : श्रीगणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही, तो श्रद्धा, संस्कार व आपल्या पुढच्या पिढीकडे मूल्ये सुपूर्द करण्याचा सोहळा आहे. हीच भावना जपत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या शासकीय निवासस्थानी यंदाचा गणेशोत्सव पारंपरिक श्रद्धेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या शासकीय निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त पर्यावरणपूरक शाडू मातीच्या श्रीगणेश मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली होती. पाच दिवस भक्तिमय वातावरणात श्री गणरायाची मनोभावे पूजा-अर्चना करण्यात आली. पाचव्या दिवशी निरोपाची वेळ आली व वातावरण काहीसे भावूक झाले होते. जिल्हाधिकारी घुगे, त्यांच्या पत्नी डॉ. मिहिका घुगे, चिरंजीव रिधान घुगे यांनी पारंपरिक पद्धतीने श्रीगणरायाची पूजा व आरती केली. त्यानंतर पर्यावरणाचे भान जपत, कोणत्याही नैसर्गिक जलस्रोतावर अतिरिक्त भार न टाकता आपल्या शासकीय निवासस्थानीच योग्यविहित पद्धतीने श्रीगणेश मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. या छोट्याशा कौटुंबिक कृतीमागे समाजासाठी एक मोठा संदेश दडलेला आहे. पर्यावरण संरक्षणाचा संदेश केवळ सूचना देऊन नव्हे, तर तो स्वतःच्या आचरणातूनही समाजापर्यंत पोहोचवता येतो. प्रशासकीय अधिकारी म्हणून नागरिकांना पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन करतानाच स्वतःच्या घरापासून त्याची सुरुवात करणे, ही कृती समाजासमोर अनुकरणीय उदाहरण ठेवणारी ठरते. शासन व प्रशासनाकडून नागरिकांना अपेक्षित असलेल्या सकारात्मक बदलाची सुरुवात स्वतःपासून केली, तर त्या संदेशाची परिणामकारकता अधिक वाढते, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. विशेष म्हणजे हा पुढच्या पिढीपर्यंत पर्यावरण संवर्धनाचे संस्कार पोहोचविण्याचा सुंदर क्षण ठरला. आज मुलांच्या मनात रुजविलेली निसर्गाबद्दलची संवेदनशीलता, जबाबदारी व पर्यावरणपूरक जीवनशैलीची जाणीव हीच उद्याच्या पर्यावरणस्नेही समाजाची पायाभरणी आहे. श्रद्धा व परंपरा जपत असतानाच निसर्गाचेही तितक्याच आत्मियतेने रक्षण करता येते. त्यासाठी मोठ्या उपक्रमांचीच आवश्यकता असते, असे नाही. शाडू मातीच्या मूर्तीची निवड, घरच्या घरी पर्यावरणपूरक विसर्जन व जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्याचा छोटासा प्रयत्नही मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरू शकतो. श्री गणरायाला निरोप देताना एका कुटुंबाने जपलेली ही पर्यावरणपूरक परंपरा समाजासाठी एक साधा, पण अर्थपूर्ण संदेश देऊन जाते. ----- कोट ज्या निसर्गाने आपल्याला सर्व काही दिले, त्या निसर्गालाही जपूया. सर्वांनी पर्यावरणपूरक पद्धतीने गणरायाला निरोप दिला पाहिजे, तरच निसर्ग जपता येईल. उत्सवाचा आनंदासोबत आपल्या परंपराही जपूया. -रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore Solapur : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘प्लॅन’ ठरला? जयकुमार गोरे काय म्हणाले?

Tata Sons N Chandrasekaran : टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून वाद; चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचा विरोध

'खीर बनवणाऱ्यालाच आधी चाखावी लागते!' ‘सूर्यवंशम’चा उल्लेख करत गौरव कपूरने बिग बींची घेतली फिरकी, Viral Video

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमध्ये लाचखोरीप्रकरणी कृषी अधिकाऱ्यासह तिघांना अटक

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

SCROLL FOR NEXT