नाशिक

अयोध्या नगरातील बंद घर फोडले.

CD
सोन्या-चांदीचे दागिने बंद घर फोडून लंपास ----- जळगावच्या अयोध्यानगरातील घटना सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२० : येथील अयोध्यानगरातील लक्ष्मीनारायणनगरमधील रहिवासी असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याचे बंद घर फोडून चोरट्याने ६० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एमआयडीसी परिसरातील आयोध्यानगरातील लक्ष्मीनारायणनगरातील रहिवासी दीपक शंकर वराडे (वय ३७) हे १५ ते १७ सप्टेंबर असे दोन दिवस घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे लोखंडी गेटचे कुलूप व मुख्य दरवाजाची कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. साहित्य अस्ताव्यस्त घरातील सर्व साहित्य चोरट्यांनी अस्ताव्यस्त फेकून देत कपाटात ठेवलेले दागिन्यांचे बॉक्स शोधून त्यातील ५० हजार रुपये किमतीचे एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, ५ हजार रुपये किमतीचे १ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ३ हजार रुपयांचा अर्धा ग्रॅमचा सोन्याचा ओमचा पेडेंट व १५० रुपये किमतीची १ भार वजनाची चांदीची लक्ष्मीमूर्ती असा एकूण साठ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. गुन्हा दाखल वराडे कुटूंबीय परतल्यावर त्यांना चोरी झाल्याचे आढळून आले. तत्काळ त्यांनी पोलिसांना घटना कळविली. याप्रकरणी दीपक वराडे यांच्या तक्रारीवरुन शनिवारी (ता.१९) एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक रामकृष्ण पाटील करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT