नाशिक

पावसाची शक्यता मर्यादितपावसाची शक्यता मर्यादित

CD
जिल्ह्यातील तापमानात वाढ होणार ----- हवामान अभ्यासकांचा अंदाज; परतीच्या पावसाची शक्यता मर्यादित सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२० : पावसाचा मोठा खंड पडल्यानंतर शेतकरी चिंतातूर आहेत. आता परतीच्या पावसावर उर्वरित खरीप हंगाम व आगामी रब्बीचा हंगाम अवलंबून आहे. असे असले तरी हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार २१ ते २५ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात पावसाची स्थिती तुरळक राहील. काही दिवस हलक्या सरी येण्याची शक्यता आहे. २२ ते २५ सप्टेंबरला दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. हा पाऊस संवाहनप्रक्रियेद्वारे येण्याची शक्यता अधिक आहे. जमिनीच्या तापामुळे हवा वर जाते. आर्द्रता घन होते व स्थानिक सरी पडतात. देशात मान्सून उत्तर-पश्चिम भागातून माघार घेत आहे. बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचा पट्टा विकसित होत आहे. तो पश्चिम-वायव्य दिशेने सरकत आहे. तो मुख्यतः ओडिशा व आंध्र प्रदेशाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्व व मध्य भारतात पाऊस वाढेल. जिल्ह्यावर याचा मर्यादित प्रभाव पडण्याची चिन्हे आहेत. तापमान व उकाडा वाढण्यामागे तांत्रिक कारणे आहेत. पाऊस ओसरल्यानंतर ढग विरळ होतात. सूर्याची किरणे जमिनीपर्यंत थेट पोहोचतात. जमीन तापते, आर्द्रता कायम राहिल्याने घाम बाहेर जात नाही. त्यामुळे उकाडा जाणवतो. एल निनोच्या प्रभावामुळे आर्द्रतायुक्त हवा कमी येत आहे. मान्सून ट्रफ उत्तरेकडे सरकल्याने स्थानिक स्थिरता वाढते. त्यामुळे तापमानात वाढ होते. कमाल तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस असेल. आर्द्रता जास्त राहील. ढगाळ वातावरण काही प्रमाणात कायम राहील. एकूणच २१ ते २५ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात पाऊस तुरळक स्वरूपात पडेल. दुपारच्या संवाहनप्रक्रियेद्वारे काही सरी येऊ शकतात. तापमानात वाढ होऊन उकाडा वाढेल, असा अंदाज हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

SCROLL FOR NEXT