नाशिक

चित्ररथाला हिरवी झेंडी

CD
धुळे टुडे १ साठी अँकर... --- फोटो- NSK26H30135 धुळे : सेवा संकल्प अभियानांतर्गत आदिवासी विभागाच्या सेवा चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून रवाना करताना आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते. सोबत इतर मान्यवर, अधिकारी. --- सेवा संकल्प अभियानाचा जिल्ह्यात शुभारंभ --- सेवा चित्ररथ रवाना; आदिवासी भागात शासकीय योजना पोहोचविण्यासाठी उपक्रम सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २० : आदिवासी विकास विभागामार्फत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान-२०२६’चा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते आणि आमदार मंजुळा गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात शुभारंभ करण्यात आला. अभियानाच्या प्रचार-प्रसारासाठी तयार करण्यात आलेल्या ‘सेवा चित्ररथा’ला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. या कार्यक्रमाला आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, सहायक प्रकल्प अधिकारी पवन सोनुने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) अजय फडोळ, तसेच श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित पाठक यांच्यासह विविध संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पेसा गावांमध्ये पोहोचणार आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, सेवा व सुविधांची माहिती सहज पोहोचविणे आणि पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. अभियानाची सुरुवात सर्व उपस्थितांनी घेतलेल्या सेवा संकल्प शपथेने झाली. हा सेवा चित्ररथ महिनाभर जिल्ह्यातील सर्व पेसा गावांमध्ये फिरणार आहे. चित्ररथाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या माहितीसोबतच आरोग्य, बालविवाह प्रतिबंध आणि व्यसनमुक्तीबाबत विशेष जनजागृती केली जाईल. विशेष शिबिरे अभियानादरम्यान तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना आधार कार्ड, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड आणि अंत्योदय कार्ड आदी आवश्यक शासकीय दाखले व लाभ तत्काळ उपलब्ध करून दिले जातील. पारधी समाजातील बांधवांसाठी विशेष शिबिरे होतील तर वनपट्टेधारक लाभार्थ्यांना ७E व १२E चे वाटप केले जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी उपक्रम पाच ऑक्टोबरला वीरांगना राणी दुर्गावती यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी महिला बचत गटांचा भव्य मेळावा आयोजित करून त्यांच्या सक्षमीकरणाला चालना दिली जाईल. तसेच जिल्ह्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे होतील. ‘माझी शाळा, माझी सेवा’ या उपक्रमांतर्गत परिसर स्वच्छता, वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, वक्तृत्व, रांगोळी व निबंध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. अभियानातील सर्व उपक्रमांचे नियोजन करुन आदिवासी भागातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत शासकीय योजना आणि सेवा पोहोचविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी विसपूते यांनी केले आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT