नाशिक

विश्वकर्मा जयंतीनिमित्त मेळावा

CD
धुळे टुडे १ साठी... --- फोटो-NSK26H30136 धुळे : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना लाभार्थी मेळाव्यात लाभार्थी महिलेला कर्ज मंजूरीचे पत्र देतांना निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार. शेजारी इतर अधिकारी. --- विश्वकर्मा योजनेचा लाभ कारागिरांपर्यंत पोहोचवा --- निवासी उपजिल्हाधिकारी पवार; मेळाव्यात टूलकिट व कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण --- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २० : प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक पारंपरिक कारागीर व गरजू घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गावपातळीवर व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना लाभार्थी मेळावा झाला. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मयूर ठेले, एसबीआयचे शाखाप्रमुख नितेश परदेशी, जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक प्रकाश घुगे, एमआयडीसी एरिया मॅनेजर पी. एस. साळुंखे, उद्योग पर्यवेक्षक योगेश भदाणे व लेखापरीक्षक पंकज विसपुते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व लाभार्थी उपस्थित होते. या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना टूलकिट आणि कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पवार म्हणाले, की सेवा संकल्प अभियानामुळे शासकीय सेवा व योजनांचा थेट लाभ नागरिकांना मिळण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. १८ प्रकारच्या पारंपरिक व्यवसायांचा समावेश असलेल्या या योजनेत प्रशिक्षण, १५ हजार रुपयांचे टूलकिट साहाय्य आणि कर्जाच्या माध्यमातून कारागिरांना स्वतःचा व्यवसाय विकसित करता येईल. बँकांनी कर्जप्रकरणांतील त्रुटी तातडीने दूर करून मंजुरी प्रक्रियेला गती द्यावी. ८६ हजार कारागिरांची नोंदणी या योजनेमुळे पारंपरिक कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळून कारागीर सक्षम उद्योजक बनतील असा विश्वास ‘यशदा’चे तज्ज्ञ मार्गदर्शक उमाकांत पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केला. प्रभारी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेश गवांदे यांनी सांगितले, की धुळे जिल्ह्यात आतापर्यंत ८६ हजार ४२० कारागिरांची नोंदणी झाली आहे. यातील एक हजार ३१७ लाभार्थ्यांना टूलकिट वाटप केले. तर ४७७ कारागिरांना पहिल्या टप्प्यातील एक लाख रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. तसेच, प्रशिक्षण कालावधीत प्रतिदिन पाचशे रुपये भत्ता दिला जात आहे. उद्योग पर्यवेक्षक योगेश भदाणे यांनी प्रास्ताविक केले तर लेखापरीक्षक पंकज विसपुते यांनी आभार मानले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT