नाशिक

कट लागल्याची कुरापतीतून टेम्पो-ट्रॅव्हलरचालकाला मारहाण

CD
पान-३ साठी ------- फोटो H30140/H30141 नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबाई गावानजीक नाशिकच्या ट्रेकर्स ग्रुपच्या टेम्पो ट्रॅव्हलर चालकाशी हुज्जत घालताना संशयित. ------ नाशिकच्या ट्रेकर्सच्या वाहनचालकाला मारहाण कट लागल्याच्या कुरापतीतून त्र्यंबक- जव्हार रस्त्यावरील घटना : तिघांना अटक, चौथा फरारी .... सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२० : टेम्पो ट्रॅव्हलरचा दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून वाद उकरून काढत टेम्पो ट्रॅव्हलर चालकाला रस्ता अडवून मारहाण आणि शिवीगाळ केल्याची घटना अंबई (ता. त्र्यंबकेश्वर) गावाजवळ घडली. त्र्यंबकेश्वर पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. टेम्पोत नाशिकमधील ट्रेकर्स अंबई गावानजीकच्या अंबा डोंगरावर ट्रेक करण्यासाठी जात असताना ही घटना घडली. .... संजय भुतांबरे, अनिल भुतांबरे, शंकर भुतांबरे या तिघांना अटक करण्यात आली आहे. विशाल भुतांबरे याचा पोलिस शोध घेत आहेत. टेम्पो ट्रॅव्हलर चालक सिध्दार्थ संजय रणशूर (३७, रा. चुंचाळे शिवार, आंबेडकरनगर, अंबड-सातपूर लिंक रोड, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, ते त्यांच्या टेम्पो ट्रॅव्हलरमधून (डीडी ०१ यू ९०४६) नाशिकचे सुमारे २०-२२ ट्रेकर्स अंबा डोंगराकडे रविवारी (ता. २०) सकाळी घेऊन जात होते. सकाळी साडेसात-पावणे आठच्या सुमारास टेम्पो अंबई गावानजीक असताना संशयित संतय भुतांबरे हा दुचाकीवरून (एमएच १५ केएन ५११२) आला आणि त्याने टेम्पोला दुचाकी आडवी लावली आणि तू कट मारल्याने माझ्या गाडीचे नुकसान झाले. त्यासाठी पैसे दे, नाहीतर तू कसा काय पुढे जातोस, असे म्हणत दमदाटी केली. चालक रणशूर यांनी समजावण्याचा प्रयत्न केला परंतु संशयिताने फोन करून आणखी साथीदारांना बोलावले असता तिघे जण दुचाकीवरून आले. त्यांनी थेट चालक रणशूर यांना शिवीगाळ करीत मारहाण सुरु केली. टेम्पोतील संजय अमृतकर यांच्यासह ट्रेकर्स खाली उतरले. त्यांनीही संशयितांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु संशयित ऐकत नसल्याने वाद सुरूच होता. अखेर त्र्यंबक पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर दोन अंमलदार घटनास्थळी आले. तोपर्यंत संशयित पसार झाले होते. त्र्यंबकेश्वर पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अंमलदार मुळाणे हे तपास करीत आहेत. पोलिसांनी अंबाईगावच्या सरपंचाना बोलावून घेत घटनेची माहिती दिली आणि संशयितांना तात्काळ हजर करण्यास सांगितले. घटनेचे गांभीर्य पाहता, सरपंचानी संशयितांना संपर्क साधून पोलिस ठाण्यात हजर केले. त्यानुसार, तिघांना पोलिसांनी अटक केली असून चौथा साथीदार पसार आहे. दरम्यान या घटनेत ट्रेकर्सना कोणीही इजा झालेली नाही. घटनेचा तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी सांगितले. -------------- ट्रेकर्समध्ये माजी विभागीय आयुक्त संजय अमृतकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २० ते २२ ट्रेकर्स अंबा डोंगरावर ट्रेक करण्यासाठी जात होते. यामध्ये नाशिकचे माजी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह सेवानिवृत्त अधिकारी, डॉक्टर्सही होते. यात सात-आठ महिलांचाही समावेश होता. .... कोट आमच्या वाहनाचा कट लागला नाही. परंतु संशयितांनी पैसे उकळण्याच्या उद्देशानेच बनाव रचला असावा. त्यांना समजावून सांगत असतानाही ते मुजोरी करीत होते. पोलिसात रीतसर तक्रार केली आहे. - संजय अमृतकर, ट्रेकर्स ग्रुप .... कोट नाशिकमधील इगतपुरी व त्र्यंबकेश्‍वरला येणाऱ्या पर्यटकांची मोठी संख्या असते. यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळते. पोलिसांनी त्यांना संरक्षण देण्याची गरज असून स्थानिकांनी पर्यटकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतल्यास असे वादविवादाचे प्रश्‍न उदभवणार नाही. - छगन भुजबळ, मंत्री, अन्न व नागरी पुरवठा, महाराष्ट्र राज्य -----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kini Toll Plaza Traffic : ‘फास्टॅग’ स्कॅनिंगला विलंब, किणी टोलनाक्यावर पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा; पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

Rajgad ST Bus: राजगड तालुक्यात एसटीचा खोळंबा; बस बंद पडल्याने ८० प्रवाशांना चार तास ताटकळावे लागले

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या दोन वनडेत श्रेयस अय्यर कर्णधार; शुभमन गिल-गौतम गंभीर का नसणार संघात?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे बीड कनेक्शन; शिरूरच्या प्रकाश मिसाळला अटक, आरोपींची संख्या १८ वर

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

SCROLL FOR NEXT