नाशिक

रायसोनी महाविद्यालयातील गणरायाला भक्तिभावाने निरोप

CD
(कृपया बातमी आजच घ्यावी, संपादकांचा निरोप) NSK26H30161 जळगाव : रायसोनी महाविद्यालयात पाच दिवसांच्या गणपतीला निरोप देण्यासाठी निघालेल्या मिरवणुकीत सहभागी विद्यार्थी. ----- रायसोनी महाविद्यालयातील गणरायाला भक्तिभावाने निरोप ------- गणेशोत्सवातून नियोजन, नेतृत्वाची शिकवण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २० : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात रायसोनी महाविद्यालयातील गणरायाला पाचव्या दिवशी भक्तिभावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. पाच दिवसांच्या या गणेशोत्सवाची सांगता उत्साह, आनंद व भावनिक वातावरणात झाली. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांसाठी हा गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सव न ठरता नियोजन, नेतृत्व, संघभावना, जबाबदारी व प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याचा अनुभव देणारा उपक्रम ठरला. गणेशोत्सवाच्या पाचही दिवसांतील विविध उपक्रमांत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. गणरायाची स्थापना, परिसराची सजावट, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन, सायंकाळी खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यात विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. प्रत्येक उपक्रमाची जबाबदारी स्वीकारत तो यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे मेहनत घेतली. त्यामुळे या उत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे, वेळेचे व्यवस्थापन, संघामध्ये समन्वय साधणे व दिलेली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडणे यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. गणेश विसर्जनापूर्वी महाविद्यालय परिसरात विधिवत आरती करण्यात आली. यावेळी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल, ॲकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore Solapur : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘प्लॅन’ ठरला? जयकुमार गोरे काय म्हणाले?

Tata Sons N Chandrasekaran : टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून वाद; चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचा विरोध

'खीर बनवणाऱ्यालाच आधी चाखावी लागते!' ‘सूर्यवंशम’चा उल्लेख करत गौरव कपूरने बिग बींची घेतली फिरकी, Viral Video

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमध्ये लाचखोरीप्रकरणी कृषी अधिकाऱ्यासह तिघांना अटक

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

SCROLL FOR NEXT