नाशिक

टिप: उत्तर महाराष्ट्र आवृत्तीत घ्यावी ही विनंती.

CD
पान-२ साठी ॲंकर AHB26B11942 नवी दिल्ली : येथील केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत सांस्कृतिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्रात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना महाराष्ट्रातील शिक्षक. ------------- राज्यातील शिक्षकांनी गाजवली दिल्ली -------------- संस्कृती मंत्रालयातर्फे प्रशिक्षणात सांस्कृतिक कलाप्रकारांचे सादरीकरण ---------------- सकाळ वृत्तसेवा मालेगाव शहर, ता.२० ः केंद्रीय संस्कृती मंत्रालयांतर्गत सांस्कृतिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्रात झालेल्या विविध राज्यांतील सांस्कृतिक सादरीकरणात महाराष्ट्रातील शिक्षकांनी लोककलांचे सादरीकरण करत दिल्ली गाजवली. सीसीआरटीच्या मुख्य केंद्रात भवभूती नाट्यगृहात राज्यातील १४ शिक्षकांनी दहा कला प्रकारांचे सादरीकरण केले. दर दिवशी एका राज्याचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची संधी देण्यात आली. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता वाढवण्यासाठी आणि शिक्षण अधिक मनोरंजक व व्यावहारिक बनवण्यासाठी अभ्यासक्रमात कला आणि हस्तकला समाविष्ट करण्याचा भाग म्हणून केंद्रीय संस्कृती मंत्रालयांतर्गत सांस्कृतिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे देशातील ६६ शिक्षकांना ''शालेय शिक्षणात एकात्मिक हस्तकला कौशल्ये'' या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले. विविध ११ राज्यांतील ६६ शिक्षक ८ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या काळात प्रशिक्षण व कार्यशाळेत सहभागी झाले होते. सांस्कृतिक कार्यक्रमात राज्यगीत, गणेश उत्सव व गणेशवंदना, गणेशआरती, वासुदेव, शेतकरी गीत, कोळी गीत, लावणी, गोंधळ गीत, वारी पंढरीची, समूहगान वेडात मराठे वीर दौडले सात, खानदेश नृत्य फिरीफिरी, यमुनेच्या तीरी ही गवळण या सारख्या लोककलांचे सादरीकरण करून दिल्लीचे सीसीआरटी प्रशिक्षण गाजवले. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र दिघे यांनी केले. यात दत्तात्रय सोनवणे (मारवड जि. जळगाव), रवींद्र शिंदे (सुलवाडे जि.नंदुरबार), तानाजी गवळी (जि. अहिल्या नगर), योहान गावित (लोखंडफळी जि. नंदुरबार), राजेंद्र दिघे (दापुरे, जि. नाशिक) यांच्यासह राज्यातील चौदा शिक्षकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सीसीआरटीचे अध्यक्ष डॉ. विनोद नारायण इंदूरकर, उपसंचालक आशुतोष, क्षेत्रीय अधिकारी देवाराम मेघवाल, डॉ. जुलेषा वानखडे आदी उपस्थित होते. ---------- प्रशिक्षणाचा फायदा - केवळ पुस्तकांमधून वाचण्याऐवजी, विद्यार्थी प्रत्यक्ष कृतीतून, वस्तू बनवून, निरीक्षण आणि स्वानुभवाने एखादा विषय शिकतात. - विद्यार्थ्यांना विषयाची समज अधिक पक्की व्हावी म्हणूनच हस्तकला-आधारित शिक्षणाला प्राधान्य दिले जात आहे. - अभ्यासक्रमानुसार विविध वस्तू तयार करणे, चित्रकला, मॉडेलिंग आणि स्थानिक कला व हस्तकलांचा वापर करणे. - यांसारख्या पद्धतींमुळे विद्यार्थ्यांची आवड तर वाढते. त्यांच्यातील सर्जनशील विचारशक्तीचाही विकास होतो. ---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kini Toll Plaza Traffic : ‘फास्टॅग’ स्कॅनिंगला विलंब, किणी टोलनाक्यावर पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा; पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

Rajgad ST Bus: राजगड तालुक्यात एसटीचा खोळंबा; बस बंद पडल्याने ८० प्रवाशांना चार तास ताटकळावे लागले

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या दोन वनडेत श्रेयस अय्यर कर्णधार; शुभमन गिल-गौतम गंभीर का नसणार संघात?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे बीड कनेक्शन; शिरूरच्या प्रकाश मिसाळला अटक, आरोपींची संख्या १८ वर

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

SCROLL FOR NEXT