लोगो : सोमवारची मुलाखत
--
फोटो : H30164
जिल्ह्यात ५४ महसूल मंडळांमध्ये दुष्काळजन्य स्थिती
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी सुचविल्या उपाययोजना
लीड
‘अल निनो’च्या प्रभावामुळे राज्यासह जिल्ह्यात पावसाचे प्रमाण यंदा कमी राहिल्याने खरीप हंगामातील पिके जागेवरच करपत आहेत. नाशिक जिल्ह्यातील १२२ महसूल मंडळांपैकी तब्बल ५४ मंडळांमध्ये दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. भविष्यातील टंचाईच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने केलेल्या तयारीसंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्याशी साधलेला संवाद.
- किरण कवडे
…
प्रश्न : दुष्काळ जाहीर होण्याचे निकष काय?
रवींद्र माने : दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ मधील निर्देशकांच्या आधारे दुष्काळ परिस्थितीचे मूल्यांकन करून दुष्काळ जाहीर केला जातो. जिल्हास्तरीय समिती याचे कामकाज बघते. यात चार स्वरूपाचे निकष लागू केले असून, मातीला ओलावा किती आहे, ५० टक्क्यांपेक्षा कमी पेरणी झाली असेल तर, ऑक्टोबरमधील भूजल पातळी आणि सलग ३-४ आठवडे पाऊसच झाला नाही तर पिके करपतात. या चार निकषांच्या आधारे मूल्यांकन केले जाते. त्यापैकी किमान तीन निकष लागू झाले पाहिजे.
…
नाशिक जिल्हा या निकषांत बसतो का?
: जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक पेरण्या झालेल्या आहेत. ३० सप्टेंबरनंतर भूजल पातळी मोजण्यात येईल. मात्र, सलग २१ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून पावसाचा खंड पडला आहे. परिणामी, जिल्ह्यातील १२२ पैकी ५४ महसूल मंडळांमध्ये हे निकष लागू होतील, अशी स्थिती आहे. यात बागलाण ६, चांदवड ३, देवळा ३, दिंडोरी १, कळवण ६, मालेगाव ८, नांदगाव ७, नाशिक ३, निफाड १, सिन्नर ८ आणि येवला ८ यांचा समावेश होतो.
…
सप्टेंबरअखेर पाऊस झाला नाही तर पुढे काय?
: खरीप हंगामाचा मूळ कालावधी जून ते सप्टेंबर आहे. या कालावधीत पडलेल्या पावसाच्या आधारे पुढील हंगाम अवलंबून असतो. खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. पण काही भागातील पिकांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे, हे मान्य करावे लागेल. त्यासाठी धरणातील पाणी सिंचनासाठी मिळेल किंवा नाही यापेक्षा उपलब्ध पाण्याचा अत्यंत काळजीपूर्वक वापर करावा लागेल.
…
रब्बी हंगामावर याचा काय परिणाम होईल?
: खरीप हंगामातील पावसावर रब्बी हंगाम अवलंबून असतो. जिल्ह्यात विशेषतः गहू, उन्हाळ कांद्याच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात पावसाचे प्रमाण जास्त राहिले तरच रब्बी हंगामातील पिके घेतली जातात. सद्यःस्थिती बघता रब्बी हंगामाचे क्षेत्र घटण्याची शक्यता अधिक आहे.
…
टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना काय असतील?
: तालुकानिहाय परिस्थिती भिन्न स्वरूपाची असल्यामुळे उपाययोजना वेगवेगळ्या असू शकतात. शेतकऱ्यांनी १९:१९:००, १३:००:४५ यांसारख्या पोटॅशची फवारणी केल्यास पिकांची टिकवणं क्षमता वाढते. पाण्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक केला पाहिजे. रब्बीसाठी पिकांची निवड करताना पाण्याची उपलब्धता विचारात घ्यायला हवी. त्याशिवाय लागवड किंवा पेरणी करू नये. गुरांना चारा, पाण्याला प्राधान्य द्यावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.