नाशिक

प्रवाशाला कोयत्याने मारून रिक्षाचालकाने लुटले

CD
रिक्षाचालकाने प्रवाशाला पंच्च्याहत्तर हजारास लुटले कोयत्याने हल्ला ः दोघांविरोधात गुन्हा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २० : गुटखा खाण्याच्या बहाण्याने देवळाली गावानजिकच्या मुस्लिम कब्रस्तान परिसरात नेऊन रिक्षात बसलेल्या प्रवाशाला कोयत्याने मारून जखमी केले. त्याच्या अंगावरील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईल व फोनद्वारे आॅनलाइन पैसे घेत लुटमार केल्याचा प्रकार घडला. नाशिकरोड पोलिसात अज्ञात रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावेश अशोक बागूल (२९, रा शामवृंदावन अपार्टमेंट, मखमलाबाद लिंक रोड. मूळ रा. जालना) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या १६ तारखेला मध्यरात्री दीडच्या सुमारास ते नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून रिक्षात बसले. रिक्षाचालकाचा एक साथीदार रिक्षात होता. दोघांनी संगनमताने गुटखा खाण्याचा बहाणा करीत रिक्षा विहितगावाजवळ असलेल्या सुन्नी मुस्लिम कब्रस्तान इदगाहजवळ असलेल्या निर्जनस्थळी घेऊन गेले. भावेश यांना संशयित रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराने अचानक शिवीगाळ सुरू करीत कोयता काढला. कोयत्याने भावेश यांच्या पायावर मारून दुखापत केली. संशयितांनी त्यांचा ३५ हजार रुपयांचा मोबाईल फोन, साडेपाच हजार रुपयांची चांदीची अंगठी, १५ हजारांची चांदीची चैन, १५ हजारांची सोन्याची कानातील बाळी असा ऐवज हिसकावून घेतला. फोन पेवरून साडेचार हजार रुपये ऑनलाईन त्यांच्या मोबाईलवर ट्रान्सफर करून घेतले. संशयितांनी असा एकूण ७५ हजार रुपयांचा ऐवज लुटला आणि पसार झाले. नाशिकरोड पोलिसात लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक नेहेते हे तपास करीत आहेत. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kini Toll Plaza Traffic : ‘फास्टॅग’ स्कॅनिंगला विलंब, किणी टोलनाक्यावर पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा; पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

Rajgad ST Bus: राजगड तालुक्यात एसटीचा खोळंबा; बस बंद पडल्याने ८० प्रवाशांना चार तास ताटकळावे लागले

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या दोन वनडेत श्रेयस अय्यर कर्णधार; शुभमन गिल-गौतम गंभीर का नसणार संघात?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे बीड कनेक्शन; शिरूरच्या प्रकाश मिसाळला अटक, आरोपींची संख्या १८ वर

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

SCROLL FOR NEXT