नाशिक

विकासाची दूरदृष्टी असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष : बापू खलाणे

CD
(बापू खलाणे यांचा फोटो घ्यावा) विकासाच्या दूरदृष्टीचे भाजप जिल्हाध्यक्ष : बापू खलाणे पत्रकारितेतून समाजकार्याची आवड निर्माण झाली. जिल्ह्यात भाजपचा लवलेश नसतानाच्या काळात १९८८ पासून भाजपमध्ये काम करीत ग्रामीण जनतेशी नाळ जुळत गेली. कापडणे गटात वर्षभरात तब्बल दोन कोटीची कामे पूर्ण केली आहेत. रुग्णांना तपासणीपासून मुंबई-पुण्यापर्यंत उपचारासाठी मदत मिळवून देण्यासाठी त्यांची धडपड सुरु असते. एक झपाटलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे बापू खलाणे. रविवारी (ता.२०) त्यांचा वाढदिवस साजरा झाला, त्यानिमित्त... - जगन्नाथ पाटील, कापडणे बापू खलाणे हे राजकारणापेक्षा समाजकारणावर भर देताना जनतेच्या संपर्कात राहतात. सातत्याने विकास कामांसाठी पंचक्रोशीत व जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. कापडणे गटात स्वातंत्र्योत्तर कालखंडात काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षाची सत्ता होती. ही सत्ता पन्नास वर्षांनंतर अर्थात १९९८ मध्ये खलाणे यांनी संपुष्टात आणली. सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपला विजय संपादीत करून दिला. जिल्ह्यात कोठेही भाजपचे अस्तित्व नसताना पहिला झेंडा रोवला. २००८ मध्ये जिल्हा परिषदेवर प्रथमच भाजप- सेना युतीचा झेंडा फडकला. धुळे तालुक्यात सिंचन, आरोग्य, शिक्षण आदी कामांसाठी ते सदोदित प्रयत्नशिल आहेत. कापडणे येथे नागरी सुविधांसह महात्मा फुलेंचा पुतळा त्यांनी उभारला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणीसाठी मोठे योगदान दिले. सामुदायिक विवाहही ते घडवून आणतात. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी प्रयत्नशील असतात. पक्षातील महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सक्षमपणे सांभाळत आहेत. सध्या भाजप किसान मोर्चाचे ते प्रदेश उपाध्यक्ष असून शेतकऱ्यांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवीत आहेत. सध्या धुळे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाध्यक्ष खलाणे यांनी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ घोषित करण्यासाठी आवाज उठविला आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून परिस्थिती मांडणार आहेत. एकंदरीत शेतकऱ्यांचा लढवय्या नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व प्रदेश उपाध्यक्षपदही सांभाळले आहे. जिल्हा परिषदेचे कृषी सभापती असताना त्यांनी शेतकरी सन्मान योजना सुरु केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : पाकिस्तानमध्ये लष्करी ताफ्यावर हल्ल्यात ४ सैनिक ठार

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT