नाशिक

तरुणाचे नाकच कापले

CD
किरकोळ वादातून तरुणाचे नाकच कापले --- कुसुंबा येथील घटना; दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २० : विवाहितेशी बोलणे अचानक बंद झाल्याने तिच्या पतीशी वाद घालून दोघांनी कटरपट्टी व कात्रीने हल्ला चढविला. यात पट्टीने दोन-तीन वार करून कात्रीने तरुणाच्या नाकाचा शेंडाच कापून टाकला. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला जिल्‍हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यातील कुसुंबा येथील स्वामी समर्थ शाळेमागे कांचन व भूषण पाटील वास्तव्यास आहेत. त्यांच्याच घराजवळील स्वप्नील राजेंद्र पाटील (वय २३) याच्याशी कांचन पाटील सहज बोलत होत्या. मात्र, पतीने समज दिल्यानंतर अचानक बोलणे बंद केल्याने स्वप्नील पाटीलचे पित्त खवळले. शनिवारी (ता. १९) दुपारी अडीचच्या सुमारास कांचन पाटील व त्यांचे पती भूषण लक्ष्मण पाटील (वय ३६) घरी असताना, संशयित स्वप्नील पाटील व धीरज संतोष खंडाळकर (वय २३) त्यांच्या घरी आले. दोघांनी शिवीगाळ करीत विवाहितेच्या पतीवर धारदार पट्टीने व कात्रीने हल्ला चढवला. मानेवर, नाकावर व काखेत वार करून गंभीर जखमी केले. हल्लेखोरास त्याचा मित्र धीरज खंडाळकर याने चिथावणी देत भूषणला संपवून टाकण्यासाठी हल्ला करण्यास प्रवृत्त केले. दोघांवर गुन्हा दाखल या घटनेनंतर गंभीर जखमी भूषण पाटील यांच्यावर जळगावच्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. याबाबत कांचन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित स्वप्नील पाटील व धीरज खंडाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे, निरीक्षक बबन अव्हाड यांनी प्रकरणाची चौकशी केली, तर उपनिरीक्षक राजश्री पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT