नाशिक

आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक दिक्षांत जाधव यांचे भारतीय संघासोबत योगदान

CD
NSK26H30197 जळगाव : सोनम मस्कर सोबत प्रशिक्षक दीक्षांत जाधव. ––– आशियाई क्रीडा स्पर्धेत दीक्षांत जाधव प्रशिक्षक सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २१ : आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक दीक्षांत संजय जाधव हे भारतीय नेमबाजी संघासोबत प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सध्‍या सुरू असलेल्‍या आशियाई क्रीडा स्‍पर्धेत त्यांच्या मार्गदर्शनाखालील खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. श्री. जाधव हे नवी दिल्ली येथील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंज येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अंतर्गत वरिष्ठ प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील खेळाडूंनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालील सोनम मस्कर हिने आशियाई क्रीडा स्‍पर्धेत एअर रायफल टीम प्रकारात रौप्यपदक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच एअर रायफल वुमेंसच्‍या अंतिम फेरीत पाचव्‍या क्रमांकावर राहत तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले. याशिवाय, श्री. जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील अनेक खेळाडूंनी आयएसएसएफ वर्ड कंप, वर्ड चॅम्‍पीयनशिप व एशियन चॅम्‍पीयनशिप तसेच इतर प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये पदके मिळवत आणि उल्लेखनीय कामगिरी नोंदवत भारतीय नेमबाजीची गुणवत्ता अधोरेखित केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

मालमत्ता ४ कोटींची, मग १३ कोटींची रोल्स रॉयस कुठून आली? मैथिली ठाकूरच्या व्हिडीओवरून CAचा सवाल, चौकशीची मागणी

Bihar viral video case: जमुई अल्पवयीन मुलीचं छेडछाड प्रकरण! राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक, पोलीस महासंचालकांना कठोर निर्देश

Lohara Crime : पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा केला खून; हल्ल्यानंतर पतीने स्वतःवर वार करून पोलिस ठाण्यात झाला हजर

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT