नाशिक

सोने व चांदीचे दर

CD
आठवड्याच्‍या पहिल्‍याच दिवशी सोन्या-चांदीच्या भावात घसरण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २१ : सुवर्ण बाजारात मागील आठवड्याच्‍या शेवटी सोन्या-चांदीचे भाव पुन्‍हा वाढले होते. मात्र, सोमवारी (ता. २१) आठवड्याच्‍या पहिल्‍याच दिवशी सोने व चांदीच्‍या भावात मोठी घसरण झाली. सोने हजार रुपये, तर चांदीचे दर तीन हजार रुपयांनी कमी झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्‍या बदलाचा परिणाम सोन्या-चांदीच्या बाजारात होत आहे. यामुळे सुवर्ण बाजारात सातत्‍याने चढ-उतार सुरूच आहेत. गेल्‍या आठवड्यात हीच स्थिती होती. मात्र, शेवटच्‍या तीन दिवसांत भावात वाढ झाल्‍यानंतर १९ सप्‍टेंबरला भाव कमी झाले होते. आठवड्याच्‍या पहिल्‍याच दिवशी सोमवारी सोने व चांदीचे भाव कमी झाले असून, सोने हजाराने, तर चांदी तीन हजार रुपयांनी स्‍वस्‍त झाली. शनिवारी (ता. १९) सोन्याचा भाव एक लाख ५३ हजार रुपयांवर (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होता. त्यात सोमवारी हजार रुपयांची घसरण होऊन सोने एक लाख ५२ हजार रुपयांवर आले, तर चांदी तीन हजार रुपयांनी स्‍वस्‍त झाली. चांदीचे भाव दोन लाख ४१ हजार (प्रतिकिलो विनाजीएसटी) रुपयांवरून दोन लाख ३८ हजार रुपयांवर आले आहेत. चौकट सोन्या-चांदीचे भाव (विनाजीएसटी) तारीख--- सोने (प्रतिदहा ग्रॅम)--- चांदी (प्रतिकिलो) १६ सप्‍टेंबर--- १ लाख ५१ हजार ५००--- २ लाख ३४ हजार १७ सप्‍टेंबर--- १ लाख ५० हजार ५००--- २ लाख ३२ हजार १८ सप्‍टेंबर--- १ लाख ५२ हजार ५००--- २ लाख ४१ हजार १९ सप्‍टेंबर--- १ लाख ५३ हजार--- २ लाख ४१ हजार २१ सप्टेंबर--- १ लाख ५२ हजार--- २ लाख ३८ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT