धुळे : टुडे पान ३ साठी...
--
फोटो क्रमांक : 30215
शिरपूर : प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या वार्षिक सभेस उपस्थित निशांत रंधे, विनोद पाटील, शशांक रंधे, संदीप पवार, आदींसह संचालक, सभासद, आदी.
--
शिक्षक पतपेढीकडून सहा टक्के लाभांश जाहीर
--
संस्थेची ४१ वी वार्षिक सभा उत्साहात; सभासदांची कर्जमर्यादा वाढवणार
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २१ : धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतपेढीची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच शिरपूर येथील मुकेशभाई पटेल टाऊन हॉलमध्ये झाली. पतपेढीचे अध्यक्ष संदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली व गटनेते तथा संचालक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनात सभा पार पडली. यावेळी अध्यक्ष पवार यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सहा टक्के लाभांश जाहीर केला.
-
सभेच्या प्रारंभी दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून सभेला सुरुवात झाली. अहवाल कालावधीतील संस्थेच्या कामकाजाचा आढावा राजेंद्र चौरे यांनी मांडला. सभासदांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना अध्यक्ष संदीप पवार, संचालक विनोद पाटील, बाबुराव वसावे, रवींद्र बोरसे, चुनिलाल अहिरे, राजेंद्र चौरे, भुपेश वाघ, छोटू राजपूत व बापू पारधी यांनी उत्तरे दिली. २०२४-२५ च्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त तसेच २०२५-२६ च्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष पवार यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सहा टक्के लाभांश जाहीर केला. हा लाभांश लवकरच सभासदांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-
गटनेते पाटील यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर शिंदे यांचा अर्धाकृती पुतळा मुख्य कार्यालयाच्या आवारात उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच, सभासदांच्या कर्जमर्यादेत वाढ करण्याचे आश्वासन दिले. सभासद योगेश धात्रक यांनी संचालक मंडळाच्या कारभाराबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. उपस्थित सभासदांनी तो एकमताने मंजूर केला. विषय क्रमांक १ ते १० सभासदांनी एकमताने मंजूर केले. सभेस ग. स. बँकेचे गटनेते निशांत रंधे, अध्यक्ष शशांक रंधे, पतसंस्थेचे संचालक सुभाष पगारे, अनिल सोनवणे, भरत तडवी, पुरूषोत्तम काळे, भाईदास पावरा, वैशाली पाटील, दिपमाला पाटील संस्थेचे माजी अध्यक्ष विजय खैरनार, जितेंद्र वळवी, ग.स.बॅंकेचे माजी संचालक संजय शिंदे तसेच विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. सुनील नहिरे यांनी सूत्रसंचालन केले. बापू पारधी यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.