धुळे : टुडे पान ३ साठी...
--
फोटो क्रमांक : 30217
उडाणे (ता. धुळे) : कीर्तनातून मार्गदर्शन करताना रविकिरण महाराज. शेजारी रायबा पाटील, बाजीराव पाटील, योगेश पाटील, भगवान गर्दे आदी.
--
कीर्तन हाच समाज
प्रबोधनाचा अमूल्य ठेवा
--
कुणाल पाटील : उडाणेत कीर्तन सोहळा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २१ : जनसेवेसाठी अंतःकरणातील सेवाभाव महत्त्वाचा असतो. महान संत- महंतांनी कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्र घडवला असून अध्यात्मातून खऱ्या अर्थाने समाजप्रबोधन होते. त्यामुळे हा अमूल्य ठेवा प्रत्येकाने जपला पाहिजे, असे आवाहन माजी आमदार कुणाल पाटील यांनी केले.
माजी आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उडाणे (ता. धुळे) येथे धर्मराज बागुल व ग्रामस्थांनी भागवताचार्य ह.भ.प. रविकिरण महाराज यांचे कीर्तन आयोजन केले होते. याप्रसंगी श्री. पाटील बोलत होते. महंत सोमेश्वर नंदगिरी महाराज यांची विशेष उपस्थिती होती. या वेळी रविकिरण महाराज यांनी विनोदी शैलीतून अनिष्ट चालीरीतींवर प्रहार करत आधुनिकतेच्या नावाखाली संस्कृती न विसरण्याचा सल्ला दिला. राजकारणाला जनसेवेची जोड असल्यास ते चिरंतन राहते, असे सांगत त्यांनी कुणाल पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. युवा नेते रायबा पाटील, बाजार समितीचे माजी सभापती बाजीराव पाटील, विद्यमान सभापती योगेश पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, प्रा. विजय पाटील, संचालक विशाल सैंदाणे, हट्टीचे माजी सरपंच त्र्यंबक पदमोर, भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस गणेश गर्दे, पोपट शिंदे, माजी सरपंच भगवान पाटील, सोमनाथ पाटील, सरपंच गवरलाल पाटील, हर्षल गवते, रवींद्र महाराज, गोरखराव पाटील, झुलाल पाटील, भगवान शिंदे, नवल पदमोर, एकनाथ पाटील, पन्नालाल पाटील, शंकर गवळी, राजेंद्र पदमोर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.